TRENDING:

ठरलं! मालेगाव महापालिकेचा महापौर-उपमहापौर कोण होणार? या नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Last Updated:

Malegaon election 2026 : महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून इस्लाम–समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मालेगाव : महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून इस्लाम–समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली असून आगामी निवडणूक प्रक्रियेबाबत उत्सुकता वाढली आहे.
malegaon election 2025
malegaon election 2025
advertisement

महापौर–उपमहापौर पदासाठी उमेदवारी निश्चित

इस्लाम पार्टीतर्फे महापौर पदासाठी नसरीनबानो शेख खालीद हाजी तर समाजवादी पार्टीतर्फे उपमहापौर पदासाठी शानेहिंद निहाल अहमद यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांनी आज नगरसचिवांकडून महापौर व उपमहापौर पदाचे नामांकन अर्ज घेतले असून सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी जाहीर होताच सेक्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

बहुमताचे गणित पूर्ण, इस्लामचा मार्ग मोकळा

महानगरपालिकेत सत्ता संपादनासाठी आवश्यक असलेले ४३ चे संख्याबळ सेक्युलर फ्रंटने गाठले आहे. काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांचे समर्थन मिळाल्याने इस्लाम पार्टीचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, काँग्रेस व भाजपच्या पाच नगरसेवकांनी ‘भारतीय विकास आघाडी’ नावाचा स्वतंत्र गट स्थापन केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

advertisement

भाजप नगरसेवकांची तटस्थ भूमिका?

भाजपच्या नगरसेवकांनी मतदान केल्यास ‘जातीयवादी पक्षाला साथ दिली’ असा आरोप होण्याची शक्यता असल्याने भाजपचे दोन नगरसेवक सभागृहात तटस्थ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भूमिकेमुळे मतदानाच्या दिवशी चित्र बदलू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नसरीनबानो यांचा राजकीय प्रवास

महापौर पदासाठी निवड झालेल्या नसरीनबानो शेख खालीद हाजी यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यांचे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. त्या इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू खालीद हाजी यांच्या पत्नी आहेत. २०१७ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे महापौरपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत पुन्हा संधी मिळवली असून यावेळी महापौरपद निश्चित होण्याची शक्यता आहे.

advertisement

उपमहापौरपदासाठी अनुभवी चेहरा

उपमहापौर पदासाठी निवड झालेल्या शानेहिंद निहाल अहमद या माजी मंत्री स्व. निहाल अहमद यांच्या कन्या असून त्या उच्चशिक्षित आहेत. एलएलबी आणि एमसीएची पदवी घेतलेल्या शानेहिंद या तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वी विरोधी पक्षनेता, गटनेता अशी जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली असल्याने सभागृहातील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे.

advertisement

निवडणूक प्रक्रिया ७ फेब्रुवारीला

महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया येत्या शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता मनपा सभागृहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया होईल. ३ फेब्रुवारी दुपारी २ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत.

स्थायी समितीवर ‘महिला राज’?

काँग्रेसच्या पाठिंब्याच्या बदल्यात प्रथम वर्षी स्थायी समिती सभापतीपद काँग्रेसला देण्यावर सहमती झाल्याची चर्चा आहे. काँग्रेस महानगरप्रमुख एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मीन बेग या दोघेही विजयी झाल्याने, स्थायी समिती सभापतीपदासाठी यास्मीन बेग यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महापालिकेत महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशा तिन्ही महत्त्वाच्या पदांवर महिला विराजमान होण्याची शक्यता असून ‘महिला राज’ची चर्चा रंगू लागली आहे.

शिवसेना–एमआयएमच्या मौनामुळे सस्पेन्स कायम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, शिवसेना आणि एमआयएमकडून पाठींब्याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. शहराच्या विकासासाठी विनाशर्त पाठिंब्याचे आवाहन इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी केले असले तरी दोन्ही पक्षांनी मौन बाळगल्याने राजकीय गूढ कायम आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी नेमके कोणते चित्र समोर येणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठरलं! मालेगाव महापालिकेचा महापौर-उपमहापौर कोण होणार? या नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल