दगडू सकपाळ हे मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुलीला तिकीट न दिल्याने माजी आमदार दगडू सकपाळ हे नाराज होते. त्यांनी माध्यमांसमोर अतिशय भावुक होत प्रतिक्रिया दिल्या होत्या. मी म्हातारा झालो, आता माझा पक्षाला उपयोग वाटत नसेल पण तरुणपणात मी पक्षासाठी सर्वस्व दिल्याची आठवण सपकाळ यांनी पक्षाला करून दिली. त्याचवेळी त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते.
advertisement
मुलगी महापालिकेसाठी इच्छुक होती पण ठाकरेंनी तिकीट नाकारलं
दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०३ मधून इच्छुक होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकीट नाकारल्याने रेश्मा सकपाळ यांनी निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली. मुलीला माघार घ्यावी लागल्याने दगडू सपकाळ प्रचंड नाराज झाले होते.
ठाकरेंना जय महाराष्ट्र, हाती धनुष्यबाण घेणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसापूर्वी दगडू सकपाळ यांची त्यांच्या परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. याच भेटीत एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेश करण्यासाठी बोलणी केली. विचार करून कळवतो, असे सपकाळ यांनी त्यावेळी सांगितले. अखेर विचाराअंती सपकाळ यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
कोण आहेत दगडू सपकाळ?
दगडू सपकाळ हे शिवसेनेते अतिशय निष्ठावंत नेते होते
लालबाग परळ भागांत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात त्यांचे वजन होते
शिवसेना पक्षाकडून ते आमदारही राहिले होते
त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जबाबदारी होती
मुंबई महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी मिळाली, अशी त्यांची इच्छा होती
परंतु उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी न दिल्याने दगडू सपकाळ नाराज झाले
