ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या आणि बँक भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांसाठी ही खूप उपयुक्त बातमी आहे. यूको बँकेने तरूणांसाठी अप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागांवर 532 जागांवर नोकर भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 31 ऑक्टोबरपर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी असणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यानंतर विद्यापीठ/ संस्था/ महाविद्यालयाने जारी केलेले गुणपत्रक आणि तात्पुरते/ अंतिम पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
advertisement
अर्जदाराचे वय 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच अर्जदाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 पूर्वी आणि 1 ऑक्टोबर 2005 नंतर झालेला नसावा. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क 800 रूपये आणि पीडब्ल्यूबीडी श्रेणींसाठी 400 रूपये आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. अधिक माहितीसाठी, कृपया बँकेने जारी केलेल्या रिक्त जागांच्या अधिसूचनेचा संदर्भ घ्यावा.
यूको बँकेसाठी अप्रेंटिस पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी अर्ज कसा करावा
- बँकेच्या अधिकृत वेबसाइट ucobank.in ला भेट द्या.
- येथे Job Opportunities या टॅबवर क्लिक करा.
- आता अप्रेंटिस नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा.
- जाहिरातीची PDF वाचूनच आपल्या पात्रतेनुसारच अर्ज करा.
UCO Bank Apprentice Vacancy 2025 Notification PDF
UCO Bank Apprentice Vacancy 2025 Apply Link
सीबीटी परीक्षेद्वारे तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारे अप्रेंटिस पदांसाठी अर्जदारांची निवड केली जाईल. या परीक्षेत 100 गुणांचे 100 प्रश्न असतील आणि ती परिक्षा एक तास चालेल. गुणवत्ता यादी राज्यनिहाय आणि श्रेणीनिहाय जाहीर केली जाईल.