छत्रपती संभाजीनगर: "ज्या संभाजीनगरवर बाळासाहेबांचं अलोट प्रेम होतं, त्या शहरात ठाकरे गटाचा लोकसभेत आणि विधानसभेत पराभव झाला, याचं शल्य त्यांना लागलं आणि मला सुद्धा लागलं आहे. तुम्हाला लागलं की मला माहिती नाही. तुमच्यासोबत बाळसाहेबांचं जे नातं मानत होते तेच मी मानतो. तुमच्यावर माझं प्रेम आहे. त्याच हक्काने इथं आलो आहे. तुमच्यावर प्रेम नसतं तर इथं कुणी आलं नसतं" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवाबद्दल पहिल्यांदाच शल्य बोलून दाखवलं.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची विराट अशी सभा पार पडली. यावेळी छत्रपतीसंभाजीनगरमधील पाण्याच्या प्रश्नाला हात घालत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
"आजची सभा ही अभूतपूर्व आहे. दानवे साहेब सत्ताधाऱ्यांना जे आव्हान केलं आहे. त्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, माझ्याकडे निष्ठेची शक्ती आहे. मला बाळासाहेबांच्या सभेची आठवण झाली, मी आज पुन्हा शिवसेनेची सुरुवात करत आहे. ज्यांना ज्यांना दिलं, त्यांना मोठं केलं, त्यांनी खाल्लं आणि गद्दार झाले आहे. रावसाहेब दानवे पडलेले खासदार पराभूत झाले तरी मस्ती नाही उतर, दानवे म्हणाले, आमच्या ताटात सगळेच पक्ष जेवून गेले. जर हे खरं असेल तर तुम्ही आमच्या पाण्यातील खरकटं का खात आहे. दुसऱ्याच्या ताटातला का खरकटं खात आहे. तुमच्या हिंमतीवर तुम्हाला पोट भरता येत नाही का, का तुम्हाला भस्म्या रोग लागला आहे का, भूक भागत नाही. किती खाययचं, असं म्हणत ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली.
"मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मला तर धक्का बसला आहे, मी मुख्यमंत्री असताना जी जी काम सुरू केली होती ती एकही झाली नाही. संभाजीनगरमध्ये ४ -४ दिवस पाणी येत नाही. इथं माणसं राहतात की नाही. इथं माणसं राहताय त्यांना चिड आणि राग येतोय की नाही. या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं नाहीतर संभाजीनगरला दररोज पाणी आणून दिलं असतं. संभाजीनगर पालिकेत जेव्हा पैसे नव्हते तेव्हा मी सरकारमध्ये योजना आणून काम सुरू केलं होतं. मुख्यमंत्री असताना मी इथं पाहून गेलो. ज्या संभाजीनगरवर बाळासाहेबांचं अलोट प्रेम होतं, त्या शहरात ठाकरे गटाचा लोकसभेत आणि विधानसभेत पराभव झाला, याचं शल्य त्यांना लागलं आणि मला सुद्धा लागलं आहे. तुम्हाला लागलं की मला माहिती नाही. तुमच्यासोबत बाळसाहेब जे नातं मानत होते तेच मी मानतो. तुमच्यावर माझं प्रेम आहे. त्याच हक्काने इथं आलो आहे. तुमच्यावर प्रेम नसतं तर इथं कुणी आलं नसतं, असंही ठाकरे म्हणाले.
अजित पवार पुन्हा पक्ष बदलताय का?
"किती निर्लज्ज लोक आहे, इकडे इंजिन, तिकडे इंजिन लागले आहे. सगळीकडे होर्डिंग लागले आहे, गती विनााशाची. ..विकास कुठे आहे, विनाशाकडे चाललो आहे. त्याच्यानंतर अजित पवार बदल हवा, काय पक्ष बदलताय का? अजित पवारांच्या होर्डिंगवर एक वाक्य वाचलं नशामुक्त करू, अहो तुम्हाला सत्तेची इतकी नशा चढली आहे, सत्ता तुमची असताना तुम्हाला काही बदल करता आले नाही, आता पालिकेची सत्ता हातात घेऊन पालिकेच्या माध्यमातून शहर नशामुक्त करणार आहे. इथं प्यायला पाणी नाही, दारूचे परवाने लगेच मिळत आहे. सरकारला परवााने देणे जमत आहे आणि पाणी देतात ये नाही.
अहमदाबादचं कर्नावती करून दाखवा
शिवसेना आणि भाजपची सत्ता होती, आम्ही तुमच्या ताटात जेवलो, बाळासाहेबांनी तुम्हाला दोन घास खाऊ घातले नाहीतर कुपोषणाने तुमच्या आज मृत्यू झाला असता. या संभाजीनगरचं नामकरण मी केलं आहे. हे मी अभिमानाने सांगत आहे. माझी ती शेवटची बैठक होती. आम्ही जर संभाजीनगर केलं नसतं, तर यांच्यामध्ये हिंमत नव्हती. जर इतकीच हिंमत असेल तर अहमदाबादचं कर्नावती करून दाखवा. जा तुम्हाला हे आव्हान आहे. अमित शहा यांचा हा मतदारसंघ आहे. आमच्या अंगावर येतात हिंदुत्व हिंदुत्व करून. तुमच्या शहराचं नामकरण करून दाखवा, शेवटच्या घरात झाकून पाहायचं आणि दुसऱ्या घरात आग लावायचं काम सुरू आहे.
तुषार आपटे तुम्हाला चालतो, हेच का तुमचं हिंदूत्व?
काल नाशिकमध्ये सभा झाली, आता विजयाच्या सभेला राज ठाकरे यांना घेऊन येईन. नाशिकमध्ये तेच, सोलापूर, कल्याण डोंबिवलीमध्ये तीच परिस्थिती आहे. यांच्याकडे उमेदवार नाही. एक दीड वर्षांपासून एका शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला होता. अक्षय शिंदेला पकडलं होतं, जलद कोर्टात न्याय होईल असं वाटत होतं. पण, अक्षय शिंदेंचा एन्काउंटर झाला. या प्रकरणात सह आरोपी हा तुषार आपटे होता. त्याला भाजपने स्वीकृत उमेदवारी दिली. अक्षय शिंदेंनं तोंड उघडे नव्हे म्हणून त्याचा एन्काऊंटर झाला. पण पुढे तुषार आपटेचं काय झालं, अटक झाली की नाही काहीच माहिती नव्हती. आता अचानक भाजपने स्वीकृत उमेदवारी दिली. हे त्यांचं हिंदुत्व आहे. मुलींवर अत्याचार करणारा सहआरोपी आहे, त्याने आमचे उमेदवार निवडून दिले म्हणून स्वीकृत उमेदवारी देतात. विकृत माणसाला तुम्ही उमेदवारी देतात, तुम्हाला विकृती चालते, हेच तुमचं हिंदूत्व का?
सांधूंना मारणारे आरोपी चालतात?
पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली होती, त्यावेळी लगेच कारवाई करून, सगळ्यांना अटक केली होती, कुणालाही सोडलं नाही. पण भाजपवाल्यांनी उद्धव ठाकरेंनी काय केली अशी मेवाभाऊने बोंब मारली होती. आता याच मेवाभाऊने हत्याकांडमध्ये जो आरोपी आहे, त्यााला भाजपने पक्षात प्रवेश दिला होता. हेच का त्यांचा हिंदुत्व आहे. तुम्हाला कोणीही चालतंय, भ्रष्टाचारी बलात्कारी, खुनी सगळे चालतात. भाजपचं वाक्य होतं राष्ट्र प्रथम, आता गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम हे घोष वाक्य झालं आहे. हा पक्ष तुम्हाला मान्य आहे का, पक्ष फोडतो, चिन्ह चोरतोय, केलेली काम चोरतोय, हा पक्ष तुम्हाला चालतोय का. भाजपचे जे निष्ठवंत आहे, त्यांची फार वाईट अवस्था आहे.
जयंत पाटील सांगलीत बोलले, माखलेले लोक भाजपमध्ये येत आहेत आणि निष्ठावंतांना यांना साफ करावे लागत आहे. भाजप हा नित्तीमत्ता, साधनसुचिता, 2014 मध्ये बोलत होते कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता विचारा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता त्यांना विचारा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.
माझी थट्टा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पैसे द्या
जाऊ तिथे खाऊ हे यांचे काम सुरू आहे. त्यांनी मला विकासावर बोलून दाखवा असे आव्हान दिले, पण इथे विकास कोणी केला ते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे. रस्ते सुधारले होते कचऱ्याचा प्रश्न दूर केला होता. पाणी योजना घेऊन आलो होतो. हा विकास नव्हता का? माझी थट्टा केल्यापेक्षा शेतकऱ्यांचे पैसे द्या, १ रुपयांमध्ये पिक विमा देताय, आधी शेतकऱ्यांचं देणं आहे. शेतकऱ्यांना मदत द्या.
फोन पेवर दोन हजार रुपये देणार असे कळले. याच्यावर निवडणूक आयोगाने पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. जर ते सच्चे असतील ते पण जर तिकडे मुजरा मारत असतील. काय अपेक्षा ठेवायची. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी दमदाट्या आणि पैसे वाटल्या जात आहे. पण मला माझ्या उमेदवारावर अभिमान आहे की निष्ठेने उभे आहेत. अधिकाराची मस्ती दाखवून तुम्ही उमेदवारानं यांना माघार घ्यायला लावत आहेत.
...नाहीतर अजितदादांची माफी मागा
अजित पवार सांगत आहेत, 70 हजार कोटी घोटाळा केला ते यांच्यासोबत सत्तेत आहे. याबद्दल विचारले तर फडणवीस सांगतात केस सुरू आहे. तुम्ही चालू आहात केस माहिती नाही. गाडीभर पुरावे तुम्ही घेऊन गेले होते त्याचे काम झाले. पुरावे मध्ये तथ्य असेल तर अजित पवार यांना खुर्चीवरून काढले पाहिजे, आणि पुरावे कुठे असेल तर त्यांनी अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा नाहीतर अजित पवारांची माफी मागायला पाहिजे. तुतोंडी गांडूळासारखे करू नका, असं आव्हानच ठाकरेंनी फडणवीसांना दिलं.
ठाकरे घराण्याची परंपरा पुढे घेऊन जात आहे. माझ्या वडिलांचे नाव घेत आहे. यानं त्यांच्या बापाची लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचे नाव घेत आहे. बाळासाहेबांना लाज वाटत असेल, गद्दार माझं कार्ट आहे. हट. पक्ष चोरला, काम चोरली, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.
मी तुम्हाला १ लाख देतो, फडणवीसांना चॅलेंज
"संभाजीनगरला वर्षातून फक्त 44 दिवस पाणी येते. 44 दिवस जे पाणी येते ते मुस्लिम आणि हिंदूचे घर बघून येते का? आमच्यामध्ये तुम्ही का आग लावता आग लावल्यावर पाणी पण नाही विझवायला. फडणवीस यांना मी आव्हान दिले आहे की, मला एक निवडणूक दाखवा की, त्यांनी केली कामे दाखवा. भाजपने केलेली काम दाखवली आहे. एक भाषण दाखवा हिदू मुस्लिम तुम्ही न करता बोलला आहात, हे दाखवा. मी एक लाख देतो. केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका तुमच्याकडे आहे. तरीही निवडणुका आल्या ही मुंबईत बांगलादेशी घुसले आहे, हे अपयश अमित शहा यांचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
