मनसेसोबत थेट युतीचे संकेत
महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी आणि अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक घेतली. या बैठकीत महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे मनसेसोबच्या युतीची जोरदार चर्चा होत असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एकप्रकारे युतीचे थेट संकेत देऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले.
advertisement
मतभेद विसरा, मनसेशी संवाद ठेवा, निवडणुकीच्या तयारीला लागा
महापालिका निवडणुकीच्या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली संपूर्ण तयारी ठेवा. आपल्यातील मतभेद विसरून कामाला लागले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठका घेऊन, चर्चा करून सुसंवाद ठेवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर बैठका, राज ठाकरे कल्याण भिवंडीच्या दौऱ्यावर
बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी आणि अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक सुरू असतानाच दुसरीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही अंबरनाथ, बदलापूर, कल्याणचा दौरा केला. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरीही भेटी दिल्या. निवडणूक विषयक चर्चा करून आगामी समीकरणांवरही पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.