राज ठाकरे यांनी पोटतिडकीने मांडणी केली. पण ही चित्रफित पाहून मराठी माणसांच्या डोक्यात तिडीक गेली नाही तर आपल्याला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या सादरीकरणाने आपल्यासोबत काय होतेय, हे मराठी माणसाला कळून चुकले असेल. त्यामुळे मुंबई आपल्या हातून जाऊ द्यायची नसेल तर येत्या १५ तारखेला इंजिन-मशाल आणि तुतारीचे बटन दाबा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
advertisement
जर मराठी माणूस पेटून उठला नाही तर...
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूहाने उद्योगांच्या नावाखाली कसं महाराष्ट्रातील जमिनी घेत सुटलं आहे आणि हे करताना व्यावसायिक एकाधिकारशाही निर्माण होत आहे, हे दाखवणारी चित्रफीत राज ठाकरे यांनी दाखवली. ही चित्रफीत पाहून जर मराठी माणूस पेटून उठला नाही तर मात्र सरकार पुरस्कृत उद्योगपतीकडून शोषण होणार हे नक्की, असे राज ठाकरे म्हणाले.
चित्रफितीत काय आहे?
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आशीर्वादाने गौतम अदानी समूह देशभरात कसा पसरत चालला आहे आणि एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे हे समजून घ्यावंच लागेल. याची चित्रफितीत राज ठाकरे यांनी सभेत दाखवली.
