TRENDING:

BMC Election Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव-राज संभाव्य युतीने कार्यकर्ते खुशीत, ठाकरेंचे नगरसेवक 'गॅस'वर, शिंदेंचीही नजर, कारण काय?

Last Updated:

Uddhav Thackeray Raj Thackeray BMC Elections : शिवसेना ठाकरे गट आणि मनसैनिकामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आनंद व्यक्त केला जात आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंचे माजी नगरसेवक गॅसवर असल्याची चर्चा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उद्धव-राज संभाव्य युतीने कार्यकर्ते खुशीत पण ठाकरेंचे नगरसेवक 'गॅस'वर, शिंदेंचीही नजर, कारण काय?
उद्धव-राज संभाव्य युतीने कार्यकर्ते खुशीत पण ठाकरेंचे नगरसेवक 'गॅस'वर, शिंदेंचीही नजर, कारण काय?
advertisement

मुंबई : आगामी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसैनिकामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमुळे आनंद व्यक्त केला जात आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंचे माजी नगरसेवक गॅसवर असल्याची चर्चा आहे.

advertisement

आगामी मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची आहे. शिवसेनेत पडलेली फूट, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी आगामी मुंबई महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. तर, दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत सातत्याने अपयश आल्यानंतर राज ठाकरे यांच्यासाठीदेखील ही निवडणूक महत्त्वाची आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांमध्ये होणारी मोठी फूट टळेल, असा अंदाज आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्याने राजकीय समीकरणं देखील बदलणार आहेत. मात्र, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

advertisement

मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला जोर चढला असला, तरी या संभाव्य युतीमुळे शिवसेना (ठाकरे गट)मधील अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. या युतीमुळे अनेक प्रभागांचा ताळमेळ बिघडण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदे युतीला आव्हान देण्यासाठी ठाकरे गट आणि मनसे यांच्यात एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत उद्धव आणि राज ठाकरे एकमेकांबद्दल सौम्य झाले आहेत, तसेच परस्पर टीका टाळत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही भावांमध्ये युती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

advertisement

बालेकिल्ल्यात कोण ठरणार सरस?

शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले एकाच परिसरात आहेत. मुंबईतील मराठीबहुल भागात या दोन्ही पक्षांचे बलस्थान आहे. त्यामुळे युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरातील दादर, शिवाजी पार्क, माहीम, वरळी, शिवडी, लालबाग, काळाचौकी, गिरगाव, भायखळा ताडदेव अशा या मराठी वस्ती भागात ठाकरे गट आणि मनसेची चांगली ताकद आहे. त्यामुळे या भागातील वॉर्डवर दोन्ही पक्ष दावेदार ठरू शकतात. अशा परिस्थितीत ठाकरे गटाला काही वॉर्ड मनसेसाठी सोडावे लागतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

advertisement

ठाकरेंच्या दावेदारांची चिंता वाढली?

या संभाव्य जागा वाटपामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वॉर्डमध्ये सक्रिय असलेले माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी धास्तावले आहेत. जागा वाटपात मनसेला आपला वॉर्ड गेल्यास मेहनत वाया जाण्याची चिंता ठाकरेंच्या शिलेदारांना सतावत आहे. काहींनी सावध पवित्रा घेत आपली सक्रियता मर्यादित केल्याची चर्चा आहे. कोणते प्रभाग मनसेकडे जाणार याबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसली, तरी या युतीची सूत्रं जुळेपर्यंत ठाकरे गटातील इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिंदे गट साधणार संधी?

ठाकरे बंधूंमधील जागा वाटप आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या नाराजीवर शिंदे गटाचेही लक्ष असणार आहे. नाराज झालेल्या प्रबळ दावेदारांना शिंदे गट आपल्याकडे खेचू शकतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे आतापर्यंत जवळपास 100 हून अधिक माजी नगरसेवक आहेत. त्यापैकी मागील टर्ममध्ये विजयी झालेले ठाकरेंचे 45 नगरसेवक आहेत. तर, मनसेचा एक माजी नगरसेवकही शिंदेंनी आपल्याकडे खेचला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत गोड-धोड खायला नको वाटतं? तर हा पदार्थ ट्राय करा, बाकरवडीही फिकी!
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव-राज संभाव्य युतीने कार्यकर्ते खुशीत, ठाकरेंचे नगरसेवक 'गॅस'वर, शिंदेंचीही नजर, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल