TRENDING:

Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election: ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणानी बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?

Last Updated:

Shiv sena UBT MNS : महापालिका निवडणुकीत युती जाहीर झाल्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास २० वर्षानंतर शिवसेना भवनात पाय ठेवणार आहेत.

advertisement
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज प्रचाराचा मेगा संडे असणार आहे. प्रचारासाठी रविवारच्या दिवसाची संधी साधत उमेदवारांकडून प्रचारावर भर देण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे महापालिका निवडणुकीत युती जाहीर झाल्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जवळपास २० वर्षानंतर शिवसेना भवनात पाय ठेवणार आहेत. युतीचा वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे जाहीर करणार आहेत.
ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणां बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?
ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणां बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?
advertisement

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीनं निवडणूक प्रचाराला वेग दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबईसाठी वचननामा जाहीर होणार आहे. या वचननाम्यात मुंबईसाठीची 'गेमचेंजर' घोषणा जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

२० वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनात...

शिवसेनेत वाद झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. शिवसेनेतून बाहेर पडल्या नंतर आज राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात पाय ठेवणार आहेत. राज ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेना भवनातून झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. याच ठिकाणाहून त्यांनी शिवसेना नेता म्हणून जबाबदारी पार पाडली. आता शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्याच ठिकाणी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार आहेत.

advertisement

>> ठाकरेंच्या वचननाम्यात कोणत्या गोष्टी?

दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे युतीच्या उमेदवारांसाठी एका सादरीकरण केलं होतं. यामध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे हे वचननाम्यातील ठळक मुद्दे असल्याचे सांगण्यात आले होते. मुंबईच्या विकासाचा रोडमॅप यात स्पष्ट करण्यात आला होता.

ठाकरे बंधूंच्या आजच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित मुद्द्यांवर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

advertisement

> जाहीरनाम्यात ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी,

> १०० युनिटपर्यंत मोफत वीज

> घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत

> कोळी महिलांसाठी ‘माँसाहेब किचन’मधून १० रुपयांत जेवण,

> तरुणांसाठी रोजगार सहायता निधी,

> बेस्ट बसचं तिकीट ५ ते १० आणि १५ ते २० रुपयांच्या दरम्यान स्थिर ठेवण्याचा निर्णय

advertisement

>प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर,

> महापालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज सुरू करणे,

> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य ग्रंथालय,

> प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,

> महापालिकेकडून मोफत पार्किंग सुविधा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
सर्व पहा

> बीपीटीच्या १८०० एकर जागेवर गिफ्ट सिटीच्या धर्तीवर विकास प्रकल्प राबवण्याचा समावेश आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election: ठाकरे बंधूंचा आज 'मेगा शो'! २० वर्षांनी राज ठाकरे 'शिवसेना भवनात', 'या' १० मोठ्या घोषणानी बीएमसी निवडणुकीचा गेम बदलणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल