TRENDING:

फडणवीसांच्या 'कोण होतास तू?' टीकेला ठाकरी स्टाईलने उत्तर, पांघरूण मंत्रालयावरून टोलेबाजी, उद्धव ठाकरे कडाडले

Last Updated:

कोण होतास तू-काय झालास तू? अशी विचारणा करून हिंदुत्व सोडल्याची टीका फडणवीसांनी ठाकरे यांच्यावर केली. त्यांच्या याच टीकेला उद्धव यांनी ठाकरी स्टाईलने उत्तर दिले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर : तामिळनाडूतील डीएमके पक्षाने न्यायमुर्ती जी.आर स्वामीनाथन यांच्याविरोधात मांडलेल्या महाभियोग प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट शब्दात वार केले. कोण होतास तू-काय झालास तू? अशी विचारणा करून हिंदुत्व सोडल्याची टीका फडणवीसांनी ठाकरे यांच्यावर केली. त्यांच्या याच टीकेला उद्धव यांनी ठाकरी स्टाईलने उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे
advertisement

आम्ही केवळ एका मुद्द्यावरून न्यायमुर्तींच्या विरोधात महाभियोग चालविण्याला पाठिंबा दिलेला नाही. त्यांच्या वर्तणुकीतले इतरही काही मुद्दे आहेत. पण आम्हाला कोण होतास तू विचारणाऱ्यांनी आधी स्वत:कडे पाहावे. मी गोमांस खातो, असे स्वत: सांगणाऱ्या किरण रिजूजू यांच्या मांडीला मांडी लावून अमित शाह जेवण करतात. अमित शाह यांनी हिंदुत्व सोडले की काय? त्यांच्यात हिम्मत असेल तर किरण रिजूजू यांच्यावर कारवाई करावी, असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले.

advertisement

भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलेस तू...!

त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांनी आता पांघरूण मंत्रालय स्थापन करावे. आणि संबंधित खात्याचा कार्यभार स्वत:कडे ठेवावा. वाटेल त्याच्यावर पांघरूण घालत सुटलेत, कोण होतास तू-काय झालास तू-भ्रष्टाचाऱ्यांना पांघरूणात घेतलेस तू...!" अशा चारोळीतून त्यांनी उत्तर दिले.

शिवराजसिंग चौहान यांनी राज्य सरकारला तोंडावर पाडले-उद्धव ठाकरे

advertisement

विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी अधिवेशन घेतले जाते. मध्यवरती अधिवेशन आले तरी विदर्भासाठी नेमकं काय दिले गेले हे समोर येत नाही. हे वर्ष विचित्र गेले. राज्यावर कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती कोसळली. काही ठिकाणी जमीन खरवडून गेली, मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजचे काय झाले, ठिबक सिंचन लागलं की काय? गेल्या महिन्याच्या अखेरीस शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की राज्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा घाईघाईने प्रस्ताव पाठवल्याचे जाहीर केले. किती कोटींचा प्रस्ताव पाठवला, हे जाहीर झाले पाहिजे. शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे. मायबाप केंद्र सरकार दया दाखवणार आहे की नाही. पीकविम्याची मदत मिळायला हवी होती. मदतीची थट्टा झालेली आहे. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार आहे का, वेळ मारून नेली जाते, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, असे ठाकरे म्हणाले.

advertisement

विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव सुचवले

आम्ही गेल्या अधिवेशनातच विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा सांगितला आहे. भास्करराव जाधव यांचे नावही जाहीर केले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी विशिष्ट संख्येचा नियम असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. उपमुख्यमंत्री हे घटनेत नसलेले पद दिले. आपल्याकडे तर दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत. घटनेत नसलेली दोन दोन पदांवर माणसं आहेत. मग विरोधी पक्षनेतेपदाला का घाबरता? उपमुख्यमंत्री हे पद रद्द झालं पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

advertisement

विरोधी पक्षनेतेपद जाहीर न करण्यावर अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची सांगड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 डिसेंबरपासून पुण्यातलं प्रसिद्ध गणपती मंदिर बंद, कारण काय?
सर्व पहा

विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्षांना भेटणार आहे का असे विचारले असता, भेटण्याची गरज काय आहे? लोकशाहीतील विरोधी पक्षनेतेपदाची मांडणी करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची सांगड आहे. अध्यक्षांबद्दल आमची मते आम्ही व्यक्त केली गेली आहे. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख, विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढाकार का घेत नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फडणवीसांच्या 'कोण होतास तू?' टीकेला ठाकरी स्टाईलने उत्तर, पांघरूण मंत्रालयावरून टोलेबाजी, उद्धव ठाकरे कडाडले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल