खरं तर नाशिकमध्ये ठाकरे बंधुंची युती झाल्यानंतर आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेतून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी काँग्रेस सोबत गेलो तर मी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये एमआयएम बरोबर युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं, की मुळात सुटायला नव्हतचं, अशा शब्दात ठाकरे यांनी युतीची खिल्ली उडवत भाजपवर टीका केली. तसेच अंबरनाथ शिवमंदीर आहे तिकडे या मिंध्याला पायपुसण्यासारखा फेकून दिलं, आणि काम झालं तसं काँग्रेससोबत युती केली,असे म्हणत ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.
advertisement
राहुल नार्वेकर विधानसभेचा अध्यक्ष निष्पक्ष नाही.त्याच्या घरात तीन तीन उमेदवार आहेत. आम्ही काही केलं तर निवडणूक आयोग हातोडा घेऊन बसतोय.निवडणूक आयोग आता शेपूट घालून बसलाय,अशा शब्दात ठाकरे यांनी निवडणुक आयोगावर ताषेरे ओढले.
आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग भाजप काय विटीदांडू खेळायला एकत्र आली काय. आम्ही सत्तेत आलो तर तुमच्यासाठी, मुंबईतल्या शाळा येऊन बघा, पालिकेत मोफत शिक्षण आहे. त्यामुळे नाशिकची सत्ता द्या सिबीएससी पॅटर्नची शाळा सुरू करू,असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नाशिककरांना दिले. नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय करून दाखवतो हे आम्ही दोन्ही भाऊ मिळून वचन देतो, आजचा वचननामा आमचा शब्द आहे.आपलं नाशिक आपल्या हातात ठेवा,असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी नाशिककरांना केले आहे.
