शिवतिर्थावरून दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल परवा (भारत पाकिस्तान) क्रिकेटची मॅच झाली. जो माणूस क्रिकेटच्या विजयाची तुलना युद्धासोबत करतो तो माणूस बेशरम असल्याची बोचरी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली.
पाकिस्तानसोबतच क्रिकेट खेळायचं होतं तर तुम्ही कशाला ऑपरेशन केलं? तुम्हीच सांगितलं ना हिंदू पाहून गोळ्या झाडल्या. एक तर तुम्ही 10 वर्षांपासून सत्तेत बसला आहात, या काळात हिंदू सुरक्षित नाही. त्यामुळे एकीकडे हिंदुत्वावर बोलायचं आणि तुमचा पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय, हीच का तुमची घराणेशाही,अशा शब्दात ठाकरे यांनी अमित शाह यांची घराणेशाही काढत टीका केली आहे.तसेच एका बाजूला तुमची नासकी घराणेशाही आणि दुसरीकडे आमची ठाकरेंची घराणेशाही आहे,त्यामुळे कशाला घराणेशाहीवर बोलता, असे ठाकरेंनी अमित शाहा यांना बजावले आहे.
advertisement
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आशिया कपच्या सूरूवातीपासून आणि स्पर्धेच्या शेवटापर्यंत भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला होता. फायनलच्या दिवशी तर पीव्हीआर आणि अशा अनेक मॉल्समध्ये हे सामने दाखवण्यात येणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे पक्षाने असे सामने दाखवल्यास टीव्ही फोडण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर पीव्हिआरने लाईव्ह प्रसारणातून माघार घेतली होती.तरी देखील मीरा रोड भागात अनेक भागात हे सामने दाखवण्यात आले होते.त्यामुळे त्या हॉटेल चालकांचे टीव्ही फोडण्यात आले होते.