विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला खासदार उदयनराजे निळा रंगाचा शर्ट घालून आले होते. याबाबत त्यांना विचारलं असता निळा रंग रंह माझ्या आवडीचा आहे, असे खास त्यांच्या शैलीत त्यांनी सांगितले.
राज्यपालांना राहण्यासाठी ४८ एकर जागा कशाला पाहिजे?
राज्यपालांच्या निवासस्थानासाठी ४८ एकर जागा कशाला ठेवली आहे? राज्यपाल निवासस्थानाची जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी द्या, अशी आक्रमक मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. अरबी समुद्राच्या बाजूला लागून असलेली दुसरी जागा कुठेही मिळू शकणार नाही. याबाबतची मागणी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
advertisement
शिवस्मारक आणि महापुरुषांचा अवमान होऊ नये, यासाठीचा कायदा पूर्वीच काँग्रेस किंवा आधीच्या सरकारांनी करायला हवे होते. शिवसेनेच्या नावातच शिवाजी महाराजांचे शिव आहे पण त्यांनीही असा कोणताही कायदा केला नाही. उठसूट कुणीही महापुरुषांबदल बोलते, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही.पण आमच्या शासन काळात अशा मानसिकतेच्या लोकांवर आम्ही कारवाई करत आहोत, असे उदयनराजे म्हणाले.
दुसरीकडे थोरले प्रतापसिंह महाराज यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली. त्याचे अनुकरण महात्मा फुले यांनी केले, या वक्तव्याबाबत खासदार उदयनराजे ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
उदयनराजे यांनी अमित शाहांसमोर केलेल्या सहा मागण्या
महाराष्ट्रात राजभवनची ४८ एकर जागा आहे, तिथे शिवरायांचे विशाल स्मारक व्हावे
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करा, अशी आग्रही मागणी
शिवाजी महाराज यांचा सर्वमान्य इतिहास शासनाने प्रकाशित करावा,
शहाजी महाराजांच्या समाधीच्या विकासासाठी राज्य शासनाने निधी द्यावा
दिल्लीत भव्य शिवस्मारक स्थापन करावे
त्याचबरोबर सिनेमॅटिक लिबर्टीमुळे होणारे गैरसमज टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करा