TRENDING:

Video: टोल नाक्यावर भीषण अपघात, ट्रक चालक दारूच्या नशेत, रिक्षा-बाईकला धडक

Last Updated:

दारूच्या नशेत असलेल्या ट्रकचालकाने भरधाव वेगात येत ऑटो आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भास्कर मेहेरे, प्रतिनिधी, यवतमाळ : उमरखेड-महागाव मार्गावरील बीजोरा टोल नाक्याजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान भीषण अपघात घडला. दारूच्या नशेत असलेल्या ट्रकचालकाने भरधाव वेगात येत ऑटो आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने या अपघातात सुमारे ७ ते ९ जण जखमी झाले आहेत.
बीजोरा टोल नाक्याजवळ अपघात
बीजोरा टोल नाक्याजवळ अपघात
advertisement

संबंधित ट्रक उमरखेडहून महागावकडे येत असताना चालकाचे वाहनावरील ( एम एच ३५ आर जे १८४३) नियंत्रण सुटले. नशेत असल्याने त्याने समोरून येणाऱ्या ऑटो आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिली . धडकेची तीव्रता इतकी होती की वाहनांचे मोठे नुकसान झाले असून प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उमरखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

advertisement

[video width="848" height="506" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-18-at-4.38.58-PM-2026-03-b98fb30d525a034f4780c9a428a0cf70.mp4"][/video]

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दादर स्टेशनचा ‘मानवी इंडिकेटर’, 4 वर्षांपासून नरेंद्र करतात अनोखी सेवा, Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
सर्व पहा

दरम्यान, या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: टोल नाक्यावर भीषण अपघात, ट्रक चालक दारूच्या नशेत, रिक्षा-बाईकला धडक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल