मुंबई महानगरपालिका या तोंडावर असून सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. अरुण गवळींची अखिल भारतीय सेना देखील तयारीत आहे. काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय सेनेच्या आणि अरूण गवळीच्या भावजई वंदना गवळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा आता अरुण गवळींची मुलगी योगिता लढण्याच्या तयारीत आहे. अरुण गवळी यांची काही दिवसांपूर्वीच सुटका झाली आणि त्यांना मानणार भायखळा मतदारसंघात मोठा वर्ग आहे. अरुण गवळी जरी सक्रिय राजकारणात उतरणार नसले तरी त्यांचा करिश्मा आागामी महानगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
advertisement
दोन्ही मुली निवडणुकीच्या रिंगणात
भायखळ्यातील 212 आणि 2017 या दोन वाॅर्डांवर अरुण गवळीचे वर्चस्व आहे. गवळीची मुलगी गीता आणि भावजई वंदना येथून विनासायास निवडून यायच्या. गवळी यांच्या अखिल भारतीय सेना या पक्षाच्या विरोधात शिवसेना उमेदवार देत नसे, मात्र यंदा सगळीच गणिते बदलली असून आगामी निवडणुकीत शिवसेना उमेदवार देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
18 वर्षानंतर अरुण गवळी बाहेर
अंडरवर्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी तुरुंगाबाहेर आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील 18 वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता. जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 18 वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर आज पहिल्यांदाचा माध्यमांसमोर आले . या वेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकांविषयी प्रतिक्रिया दिली. अरुण गवळी म्हणाले, मी निवडणुकींबाबत इच्छुक नाही, अन् उतरणारही नाही
ठाकरेंची मुलगी मतदारक्षेत्रात लोकप्रिय
शिवसेना नेत्याची हत्या केल्याच्या आरोपातून अरुण गवळी तुरुंगात आहे. त्यानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी गीता गवळी पुढे नेत होत्या. या अगोदर गीता गवळी या प्रचंड मताने निवडुन आल्या आहेत. डॉनची मुलगी असली तरी गीता आपल्या मतदारक्षेत्रात लोकप्रिय आहेत.