केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून इंजिनियरिंगच्या वेगवेगळ्या पदांसाठी 474 जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. अर्जदारांना https://upsconline.nic.in/login या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरता येणार आहे. 26 सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने अर्जप्रक्रियेला सुरूवात झाली असून 16 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शिवाय, अर्ज शुल्क भरण्याचीही शेवटची तारीख 16 ऑक्टोबरपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जदारांनी अर्ज शुल्क भरल्यानंतरच तो अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी एकदा अर्जदारांनी संपूर्ण जाहिरातीची PDF वाचायची आहे. त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
advertisement
सिव्हिल इंजिनियरिंग (श्रेणी- I), मेकॅनिकल इंजिनियरिंग (श्रेणी- II), इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग (श्रेणी- III), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग (श्रेणी- IV) या पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, याची माहिती जाहिरातीत देण्यात आलेली नाही. परंतू, एकूण किती जागांवर भरती होत आहे, याची माहिती दिली आहे. संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक आहे, अशी शैक्षणिक पात्रता असणार आहे. 21 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी काही वर्षांसाठीची वयोमर्यादेत सूट दिली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची वयामध्ये सूट आहे, तर इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा आहे.
अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्जप्रक्रिया आणि अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य उमेदवारांना आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांना 200 रूपये इतका अर्ज शुल्क भरायचे आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व्यक्ती आणि महिलांना अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. जाहिरातीमध्ये पूर्व परीक्षेची तारखही नमूक करण्यात आली आहे. UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे.