केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळ upsc.gov.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेला तब्बल४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. बुधवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध केला आहे. जून २०२५ मध्ये परिक्षा पार पडली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती आणि व्यक्ती चाचणी घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी निकाल आता जाहीर झाला असून IES पदासाठी 12 आणि आयएसएस पदासाठी 35 उमेदवारांची निवड झाली आहे.
advertisement
सोलापूरचे मयुरेश वाघमारे देशात आठवा
सोलापूर इथं राहणारे मयुरेश वाघमारे यांनी या परिक्षेत आठवं स्थान पटकावलं आहे. मयुरेश वाघमारे हे अलिबागमध्ये अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे सुपूत्र आहे. तसंच त्यांचे आजोबा हे अंगद वाघमारे हे सुद्धा उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेचं बाळकडू घरीच मिळालेल्या मयुरेश वाघमारे यांनी आता आयएएस श्रेणीतील परिक्षेत यश संपादित केलं आहे. मयुरेश वाघमारे यांची आता केंद्रीय वित्त मंत्रालयामध्ये किंवा आरबीआय बँकेत उच्चपदावर निवड होण्याची शक्यता आहे.
देशात पहिला कोण?
यूपीएससी २०२५ चा निकाल जाहीर झाला आहे, यामध्ये मोहित अग्रवाल नदबईवाला हा पहिला आला आहे. तर ऊर्जा रहेजा देशात दुसरा आला आहे. तिसऱ्या स्थानावर गौतम मिश्रा आहे. एवढंच नाहीतर भारतीय सांख्यिकी सेवा (ISS) 2025 साठी घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये कशिस कसाना देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. आकाश शर्मा दुसरा तर शुभेंदू घोष यांची तिसऱ्या स्थानावर आहे. आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी 12 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.