TRENDING:

Uttarakhand : उत्तरकाशी आपत्ती! महाराष्ट्राचे 52 पर्यटक बेपत्ता, गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना

Last Updated:

Uttarkashi Dharali Maharashtra Tourist : उत्तराखंडमधील पूरग्रस्त आणि भूस्खलन झालेल्या भागात महाराष्ट्रातील 52 पर्यटक बेपत्ता आहेत. दोन दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई/देहरादून:  उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील पर्यटकांची चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, उत्तराखंडमधील पूरग्रस्त आणि भूस्खलन झालेल्या भागात महाराष्ट्रातील 52 पर्यटक बेपत्ता आहेत. दोन दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. तर, दुसरीकडे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तातडीने उत्तराखंडला रवाना झाले आहेत.
उत्तराखंड आपत्ती! महाराष्ट्राचे 52 पर्यटक बेपत्ता, गिरीश महाजन उत्तरकाशीला रवाना
उत्तराखंड आपत्ती! महाराष्ट्राचे 52 पर्यटक बेपत्ता, गिरीश महाजन उत्तरकाशीला रवाना
advertisement

उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी भयंकर ढगफुटी झाली होती. त्यानंतर नदीला आलेल्या पुरात अख्खे गावच भूईसपाट झाले. या दुर्घघटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला. तर 50 हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, जळगाव, नांदेड आदी जिल्ह्यांतील अनेक पर्यटक उत्तराखंडच्या पर्यटनासाठी गेले होते. आपत्तीग्रस्त भागात एकूण 160 पर्यटक अडकले होते. यापैकी 108 जण सुखरूप बाहेर पडले असून त्यांची माहिती सरकारकडे आहे. मात्र उर्वरित 52 जणांचा थांगपत्ता लागत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. राज्य सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने उत्तराखंडला रवाना करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आदेश देत मदत आणि शोधकार्य अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले.

advertisement

गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये जाऊन स्थानिक प्रशासन, उत्तराखंड सरकार, दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मदत कक्ष आणि मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यासोबत समन्वय साधून शोध मोहीम अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यावर भर देणार आहेत. राज्य सरकारने विशेष हेल्पलाइन, माहिती केंद्र आणि मदत कक्ष कार्यरत केले आहेत. पर्यटकांचे नातेवाईक, अधिक माहितीसाठी महाराष्ट्र मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात.

advertisement

महाराष्ट्र सरकारचा आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत झाला आहे. बेपत्ता पर्यटकांची संपर्क करण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी राज्य सरकारचा हा विभाग संपर्कात आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्कालीन केंद्र कार्यालयाने, संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : 9321587143 / 022-22027990 / 022-22794229

advertisement

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र,उत्तराखंड : 0135-2710334 / 821

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uttarakhand : उत्तरकाशी आपत्ती! महाराष्ट्राचे 52 पर्यटक बेपत्ता, गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल