जाणून घ्या भाज्यांचे दर
पालक आणि मेथीचे भाव सध्या 60 रुपये आहेत. कोथिंबीर एक मोठी जुडी 100 रुपये आणि एका सामान्य जुडीचे भाव 60 रुपये इतके झाले आहेत. भेंडीचा किलो भाव 150 रुपये, गवार 200 रुपये, फ्लॉवर 80 रुपये, दुधी 100 रुपये, सिमला मिरची 100 रुपये, टोमॅटो 50 रुपये आणि फरसबी 100 रुपये इतके आहे. कोबी 60 रुपये, वांगी 70 रुपये, वटाणा 180 रुपये यांसारख्या भाज्यांचे दर वाढले आहेत.
advertisement
फुलांच्या बाजारपेठेतही महागाई दिसून येत आहे. झेंडूचे दर गुणवत्तेनुसार बदलतात. तीन नंबर झेंडू 20 रुपये किलो, दोन नंबर झेंडू 60 ते 70 रुपये किलो, तर एक नंबर झेंडू 100 रुपये किलो इतके मिळत आहेत. शेवंती 250 रुपये किलो, तर गुलाब 30 रुपयांना 20 गुलाब मिळतात. या वाढत्या दरांमुळे घरगुती खर्च आणि बाजारपेठेवर ताण निर्माण झाला आहे.
ताज्या भाज्यांच्या उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे, पण हवामानातील अनियमितता आणि अतिवृष्टीमुळे ते सध्या शक्य होत नाही. ग्राहकांना महागाईपासून बचाव करण्यासाठी स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. या परिस्थितीत थोडक्यात सांगायचे तर, मराठवाडा आणि विदर्भातील अतिवृष्टीमुळे राज्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, मुंबईसह महानगरांमध्ये ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे.