Lalita Panchami 2025 : ललिता पंचमी व्रत कुणी करावं? पूजा विधी आणि महत्त्व काय? संपूर्ण माहितीचा Video

Last Updated:

शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत साजरे केले जाते. यंदा 2025 मध्ये हे व्रत शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे.

+
ललिता

ललिता पंचमी व्रत कुणी करावं? जाणून घेऊ संपूर्ण पूजा विधी 

मुंबई : शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत साजरे केले जाते. यंदा 2025 मध्ये हे व्रत शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. देवी ललिता (त्रिपुरसुंदरी) यांची या दिवशी विशेष पूजा-अर्चना केली जाते. ललिता देवीला दहा महाविद्यांपैकी एक मानले जाते तसेच त्या सतीचे रूप आणि चंडीचे स्थान प्राप्त आहेत. ललिता पंचमीचे हे ललिता व्रत कसे करावे? याचे महत्त्व काय? याबद्दल आदित्य जोशी गुरुजी यांनी माहिती दिली आहे.
पंचमी तिथीचा प्रारंभ 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:33 वाजता होईल, तर समाप्ती 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12:03 वाजता होणार आहे. या दिवशीचा अभिजीत मुहूर्त 11:48 ते 12:36 असा लाभदायी मानला गेला आहे.
advertisement
पूजा विधी
ललिता पंचमीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र धारण करावीत. व्रताचे संकल्प घेऊन पूजा स्थळी चौकीवर लाल वस्त्र पसरवून देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केली जाते. त्यानंतर लाल फुले, लाल वस्त्र, कुमकुम, रोली, अक्षत अर्पण करून देवीची पूजा केली जाते. या दिवशी ललिता सहस्त्रनाम व ललिता त्रिशती यांचे पठण अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
ललिता पंचमीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे रोग-दोष दूर होतात, आरोग्य लाभते, घरात सुख-समृद्धी वाढते आणि मनोकामना पूर्ण होतात, असा धार्मिक समज आहे.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Lalita Panchami 2025 : ललिता पंचमी व्रत कुणी करावं? पूजा विधी आणि महत्त्व काय? संपूर्ण माहितीचा Video
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement