Special Report: डॉक्टरांच्या हाती दहशतवादाची शस्त्र, उच्चशिक्षित तरूण का भरकटले?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एकंदरीतच उच्चशिक्षित मु्स्लीमांमधील काही तरूण दहशतवादाच्या मार्गावर का जात आहेत, असे चित्र दिसत आहे.
नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या स्फोटात काश्मीरमधील डॉक्टरांचं कनेक्शन समोर आलंय. त्यामुळे एक गंभीर मुद्दा समोर आलाय. उच्चशिक्षित मुस्लीम तरूण दहशतवादाकडे का वळत आहेत? असा प्रश्न आता निर्माण झालाय. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामागील अनेक धक्कादायक कंगोरे समोर येताहेत. स्फोटात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नव्हे तर भारतातील उच्चशिक्षित मुस्लीम तरूणांचा सहभाग असल्याचं उघड झालंय.
स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी डॉ. मुझम्मिल हा स्फोटाचा मास्टरमाईंड असून त्याच्याकडून 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती. आरोपी डॉ. आदिल अहमद, आरोपी डॉ. अहमद मोहिउद्दीन कटात सहभागी होती. तर अटकेतील आरोपी डॉ. शाहीन सईदवर भारतात जैशची महिला विंग तयार करण्याची जबाबदारी होती. संशयित आत्मघातकी हल्लेखोर डॉ. उमर स्फोटात ठार झालाय. हे सर्व आरोपी उच्चशिक्षित आणि डॉक्टर आहेत. हे सर्व डॉक्टर जैश ए मोहंमदच्या व्हॉईट कॉलर मोड्यूलमध्ये सहभागी होते. इतकंच नव्हे तर या सर्वांनी घातक शस्त्रही बाळगली होती.
advertisement
डॉक्टरला अटक
गुजरातमध्येही नुकतीच एका डॉक्टरला अटक करण्यात आली. डॉ. अहमद मोहिउद्दीन हा 'रिसिन' विष तयार करत होता. त्याला 7 नोव्हेंबरला गुजरातच्या एटीएसनं अटक केली होती. हैदराबादचा रहिवासी असलेल्या अहमदनं चीनमध्ये शिक्षण घेतलं होतं.धक्कादायक बाब म्हणजे त्याने देशातील अनेक गर्दीच्या ठिकाणांची रेकीही केली होती.
तरूणांचं समुपदेशन करण्याची गरज
एकंदरीतच उच्चशिक्षित मु्स्लीमांमधील काही तरूण दहशतवादाच्या मार्गावर का जात आहेत, असे चित्र दिसत आहे. कट्टरतावादी विचारसरणीच्या प्रभावामुळे काही तरूण शस्त्र हाती घेतात. काही कट्टरतावादी धार्मिक नेते तरूणांना भडकवतात. अन्यायाच्या भावनेतून काही जण चुकीच्या मार्गावर जातात. ब्रेनवॉशिंगमुळेही दहशतवादाकडे काही तरूण ओढले जातात. त्यामुळे मुस्लीम समाजातील प्रगत आणि शांततावादी नेत्यांनी पुढाकार घेऊन तरूणांचं समुपदेशन करण्याची गरज आहे.
advertisement
व्हाईट कॉलर मोड्यूलनं दिल्लीत स्फोट का घडवला?
पाकिस्तानातील जैश ए मोहंमदच्या भारतातील व्हाईट कॉलर मोड्यूलनं दिल्लीत स्फोट का घडवला,? असा सवाल उपस्थित आहे. मसूद अझहर हा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या असून ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला होता. भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे मसूद अझहरला अफगाणिस्तानात आश्रय घ्यावा लागला होता. यामुळे मसूद अझहरचा बदला घेण्यासाठी जैश ए मोहम्मदच्या व्हाईट कॉलर मोड्यूलनं दिल्लीत स्फोट घडवून आणला. मात्र ही आगळीक मसूद अझहर आणि पाकिस्तानला महागात पडू शकते. कारण ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आधीच रोखठोक भाषेत स्पष्ट केलंय.
advertisement
भारतात झालेला कोणताही दहशतवादी हल्ला हा, 'अॅक्ट ऑफ वॉर' असेल असा इशारा आधीच देण्यात आलाय. त्यामुळे आता पाकिस्तानात काऊंटडाऊन सुरू झालंय. कोणत्याही क्षणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत हिशेब चुकता करेन, ही भीती पाकिस्तानला सतावतेय. आणि त्यांच्या मनातील भीती कधीही प्रत्यक्षात उतरू शकते, यात शंकाच नाही.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 11, 2025 10:05 PM IST


