ओटीटीवर येऊनही थिएटर्समध्ये गर्दी! 'लोका चॅप्टर १' चा शॉकिंग रेकॉर्ड, ही कामगिरी करणारा एकमेव मल्याळम सिनेमा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
OTT Best Superhero Film : हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला असून, थेट ७५ दिवसांपासून सिनेमाघरात तग धरून आहे! विशेष म्हणजे, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृहात हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या अनेक चित्रपट येतात आणि जातात, पण काही चित्रपट इतिहास रचतात. अभिनेता दुलकीर सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने बनवलेला 'लोका चॅप्टर १' या सुपरहिरो चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत एक जबरदस्त विक्रम केला आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला असून, थेट ७५ दिवसांपासून सिनेमाघरात तग धरून आहे! विशेष म्हणजे, चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृहात हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
७५ दिवस, ३०० कोटींची कमाई
'लोका चॅप्टर १' हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि ७५ दिवस पूर्ण केल्याबद्दल प्रॉडक्शन टीमने आनंद व्यक्त केला आहे. दुलकीर सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, "दुबई वॉक्स सिनेमामध्ये ७५ दिवसांपर्यंत न थांबता चालू आहे! आताच तुमची तिकिटे बुक करा." या पोस्टवर चाहते अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने, "ही फिल्म तर आहे शानदार!" असे म्हटले, तर दुसऱ्याने, "आता ओटीटीवरही धुमाकूळ माजवत आहे!" असे लिहिले.
advertisement
advertisement
मल्याळम सिनेमाचा इतिहास
'लोका चॅप्टर १' ने कमाईच्या बाबतीत अनेक मोठे विक्रम मोडून टाकले आहेत. या चित्रपटाने जगभरात ३०१ कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे, मल्याळम चित्रपटसृष्टीतील ३०० कोटींची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे! यापूर्वी कोणत्याही मल्याळम चित्रपटाने हा आकडा पार केला नव्हता. या सिनेमाने भारतात १८२.८० कोटी, तर परदेशात ११७ कोटींची कमाई केली आहे.
advertisement
ओटीटीवरही 'लोका'चा जलवा
हा सुपरहिरो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म 'जियोहॉटस्टार' वर प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये ७५ दिवस चालल्यानंतरही ओटीटीवर चित्रपट ट्रेंड करत आहे, हे 'लोका चॅप्टर १' च्या कथेची आणि मेकिंगची ताकद दाखवते. कल्याणी प्रियदर्शनची भूमिका असलेल्या या चित्रपटाने केवळ पैसाच नाही, तर प्रेक्षकांचे मनही जिंकले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 9:53 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ओटीटीवर येऊनही थिएटर्समध्ये गर्दी! 'लोका चॅप्टर १' चा शॉकिंग रेकॉर्ड, ही कामगिरी करणारा एकमेव मल्याळम सिनेमा


