Excise officer ला ‘संघप्रेम’ महागात, RSSच्या पथसंचलनात पाहा काय केलं; राज्य सरकारने केली मोठी कारवाई
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
RSS Route March: केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील मद्य नियंत्रण विभागाच्या सहाय्यक निरीक्षकाला आरएसएस पथसंचलनात गणवेशात सहभाग घेतल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.
पालक्काड: केरळातील एका मद्य नियंत्रण विभागाच्या (एक्साईज) अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या पथसंचलनात सहभाग घेतल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.
माहितीनुसार पालक्काड जिल्ह्यातील मानारक्कड एक्साईज विभाग कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक निरीक्षक के. व्ही. शन्मुगन यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबरला महा नवमीच्या दिवशी कल्लडीकोट्टू या ठिकाणी पार पडलेल्या आरएसएसच्या कार्यक्रमात संघाच्या गणवेशात ते सहभागी झाले होते.
advertisement
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या सेवा नियमांचा हा स्पष्ट भंग असल्याचे तपासात आढळले. पालक्काड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सादर केलेल्या अहवालानंतर शन्मुगन यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. केरळ सरकारी सेवक आचारसंहितेनुसार, सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय किंवा संघटनात्मक कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होऊ शकत नाहीत किंवा सार्वजनिक सेवेची तटस्थता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करू शकत नाहीत. या प्रकरणाशी संबंधित आगामी विभागीय चौकशी सुरू आहे.
advertisement
RSSच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावरून सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी कर्नाटकमध्ये पंचायत विभागातील एका अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेस सरकारने सार्वजनिक ठिकाणी संघाच्या उपक्रमांवर निर्बंध घालणारे नियम लागू केले आहेत. आता केरळमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 9:49 PM IST
मराठी बातम्या/देश/
Excise officer ला ‘संघप्रेम’ महागात, RSSच्या पथसंचलनात पाहा काय केलं; राज्य सरकारने केली मोठी कारवाई


