नवी मुंबईमध्ये राजकीय समीकरण बदलणार! महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कुठे-काय आरक्षण?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पाच वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेत आता प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
नवी मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आलंय.नव्या आराखड्यानुसार महापालिकेत एकूण 111 सदस्य निवडून येणार आहेत. बहुतांश प्रभाग चार सदस्यांचे असतील,तर केवळ एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे.
महिलांसाठी यंदाही मोठ्या प्रमाणात आरक्षण ठेवण्यात आले आहे. 111 पैकी तब्बल 56 जागा महिलांसाठी राखीव असल्याने, पुन्हा एकदा महिला नगरसेवकांचा दबदबा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक ठरणार आहे. मूळत: मार्च 2020 मध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते, मात्र कोविड मुळे त्या स्थगित झाल्या. त्यामुळे पाच वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या महापालिकेत आता प्रत्यक्ष निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
advertisement
आरक्षणानुसार, अनुसूचित जातींसाठी 10 जागा, अनुसूचित जमातींसाठी 2 जागा, इतर मागासवर्गीयांसाठी 29 जागा तर सर्वसाधारण वर्गासाठी 70 जागा राखीव ठेवल्या आहेत.या नव्या प्रभागरचनेनंतर शहरातील अनेक राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना ही 2011 च्या जनगणनेनुसार ठरवलेल्या प्रभाग रचनेवर आधारित आहे. निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार याद्यांच्या आधारे प्रभागनिहाय आरक्षण निश्चित केले असून, ही सोडत शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली.
advertisement
- अनुसूचित जाती : 10 जागा (त्यापैकी 5 महिला)
- अनुसूचित जमाती : 2 जागा (त्यापैकी 1 महिला)
- मागासवर्गीय जाती : 29 जागा (त्यापैकी 15 महिला)
- सर्वसाधारण महिला : 35 जागा
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा महिला राज
तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे माजी नगरसेवक, राजकीय इच्छुक
उमेदवार आणि नवीन चेहरे यांचे लक्ष लागून आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागांमध्ये राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या नव्या चेहऱ्याचा वरचष्मा राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांचे सक्षमीकरण केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेली ही आरक्षण रचना नवी मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा महिला राज प्रस्थापित करणार असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 9:52 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नवी मुंबईमध्ये राजकीय समीकरण बदलणार! महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कुठे-काय आरक्षण?


