Home Loan: जे बँका सांगत नाहीत ते इथे वाचा, 50 लाखांच्या होम लोनवर जवळपास शून्य व्याज; लोन झटकन मिटवण्याचा फॉर्म्युला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Home Loan Interest Free: घर खरेदीचं स्वप्न साकार करताना होम लोनचं व्याज सर्वाधिक त्रासदायक ठरतं. पण SIPच्या मदतीने हेच व्याज शून्यावर आणता येईल आणि लोन फक्त 12 वर्षांत संपवता येईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
मुंबई: होम लोन म्हणजे घर खरेदीचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग, पण त्याच वेळी सर्वात मोठा आर्थिक ताण असतो तो व्याजाचा. उदाहरणार्थ: जर तुम्ही 50 लाख रुपयेचं होम लोन 8.5 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी घेतलं, तर तुम्हाला एकूण जवळपास 1 कोटी 7 लाख रुपये परत द्यावे लागतील. त्यात 57 लाख रुपये हे केवळ व्याज असेल. पण एक स्मार्ट उपाय असा आहे, ज्यामुळे होम लोनवरील व्याज जवळपास शून्य होऊ शकतं.
advertisement
या योजनेचा आधार आहे SIP – म्हणजेच Systematic Investment Plan. म्हणजेच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या लोनचं prepayment करू शकता.
उदाहरणार्थ: जर तुम्ही 50 लाखचं लोन 20 वर्षांसाठी घेतलं आणि दरमहा 43,391 रुपयेची EMI भरत असाल, तर एकूण परतफेड 1 कोटी 4 लाख 13 हजार रुपये होईल ज्यात 54 लाख 13 हजार रुपये हे केवळ व्याज असेल.
advertisement
SIP चा स्मार्ट ट्रिक असं सांगतो की, प्रत्येक वर्षी मिळणारा tax refund आणि लोनच्या principal repaymentवर वाचणारा TDS refund म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये गुंतवा. उदाहरणार्थ: पहिल्या वर्षी तुमच्या 80C आणि 24B कलमानुसार जवळपास 62,700 रुपयेचा कर परतावा मिळेल.
advertisement
हे पैसे दरवर्षी SIP स्वरूपात गुंतवा जिथे सरासरी 12 टक्के परतावा अपेक्षित मानला जातो. दुसऱ्या वर्षी तुमचा टॅक्स रिफंड वाढेल, त्यामुळे एसआयपीची रक्कमही वाढवा. अशा प्रकारे 20 वर्षांमध्ये तुमचं गुंतवणूक फंड जवळपास 1 कोटी 13 लाख रुपयेपर्यंत वाढेल. या रकमेतील भाग दरवर्षी लोनचं Prepayment करण्यासाठी वापरल्यास लोनचा कालावधी कमी होईल आणि व्याजावरील भार जवळपास संपून जाईल.
advertisement
Financial Express च्या मते, या तंत्राने काम केल्यास 12 व्या वर्षापर्यंत तुमचं लोन पूर्णपणे फेडलं जाईल. एकूण EMI payment फक्त 52 लाख रुपये राहील म्हणजे मूळ कर्जाएवढीच परतफेड करावी लागेल आणि व्याज शून्य. मात्र हा परतावा Equity Mutual Fundsवरील 12 टक्के दरावर आधारित असून, तो गॅरंटीड नाही. बाजारातील चढ-उतारामुळे जोखीम राहते.
advertisement
जर तुम्ही दरमहा 10,000 रुपयेची मोठी एसआयपी सुरू केली आणि त्यावर सरासरी 12 टक्के परतावा मिळाला, तर 20 वर्षांत 83 लाख रुपये जमा होतील. दरवर्षी या निधीतून prepayment केल्यास लोन आणखी लवकर संपवता येईल. सध्या बहुतांश floating rate loans वर prepayment charges नसतात, तर काही fixed rate loans मध्ये 2 टक्के पर्यंत शुल्क लागू होऊ शकतं.
advertisement
हे धोरण tax saving refund, compounding आणि आर्थिक शिस्त यावर आधारित आहे. प्रत्येक वर्षी गुंतवणूक वाढवत राहिल्यास, फंड वाढतो आणि कर्जभार कमी होतो. दीर्घकालीन दृष्टीने ही पद्धत व्याजविरहित लोन फेडण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Home Loan: जे बँका सांगत नाहीत ते इथे वाचा, 50 लाखांच्या होम लोनवर जवळपास शून्य व्याज; लोन झटकन मिटवण्याचा फॉर्म्युला


