Bihar Exit Poll: 20 वर्षानंतरही नितीश पुन्हा पुन्हा कसे येतात? अँटी इन्क्मबसी का नाही? 4 कारणांत दडलंय यशाचं गुपित
- Published by:Prachi Amale
Last Updated:
NDAला 243 पैकी 140-150 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर राजद आणि काँग्रेस असलेल्या महागंठबंधनला 85-95 जागा मिळण्याची शक्यता आहे
Bihar Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान पूर्ण झालं आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र या निकालापूर्वी सर्वात मोठा एक्झिट पोल हाती आला आहे. न्यूज 18 मेगा एक्झिट पोल हा सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आहे. यानुसार बिहारमध्ये NDA सत्ता राखताना दिसतंय. NDAला 243 पैकी 140-150 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर राजद आणि काँग्रेस असलेल्या महागंठबंधनला 85-95 जागा मिळण्याची शक्यता आहे. यानुसार NDA सहजपणे 122 ची मॅजिक फिगर गाठताना दिसत आहे. तर जनसुराज्य पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांना 0 ते 5 जागा मिळण्याची शक्यता असून, 5-10 अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात.
2020 च्या तुलनेत या वेळी NDA साठी आकडेवारी अधिक मजबूत आहे. 2020 मध्ये NDA ने 125 जागा जिंकल्या होत्या. या वेळी सरासरी 154 जागांच्या अंदाजाने NDA सत्तेवर परतण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. 2020 मध्ये JDU ला फक्त 43 जागा मिळाल्या होत्या, तर या वेळी 60 ते 70 जागांपर्यंत झेप घेण्याची शक्यता व्यक्त होते. या 12 सर्वेक्षणांचा एकत्रित “पोल ऑफ पोल्स” घेतल्यास सरासरी एनडीएने 154, एमजीबीने 84 आणि इतरांना 5 जागा मिळाल्या आहेत
advertisement
NDA च्या विजयाचं काय कारण आहे?
नितीश कुमार यांचं पुनरागमन
लोजपच्या बंडखोरीनंतर 2020 मध्ये गमावलेला ग्रामीण आणि EBC मतदारवर्ग JDU कडे परतला आहे.
नितीश कुमार यांची प्रशासनावरील पकड,कामाची पद्धत यामुळे मतदारांना पाठिंबा मिळालेला दिसतो.
भाजपचा शहरी मतदार
BJP ला शहरी, सवर्ण आणि महिला मतदारांचा ठोस पाठिंबा मिळाला आहे. जरी जागा गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा संख्या किंचित घट असली तरी NDA च्या एकत्रित आकड्यात घट झालेली दिसत नाही,
advertisement
छोट्या पक्षांचा फायदा
LJP , HAMS आणि RLM यांसारख्या NDA सहयोगींच्या मतविभाजनामुळे आघाडीचं समीकरण आणखी स्थिर झालं आहे.
MGB साठी धोक्याची घंटा
महागठबंधनला या निवडणुकीत 110 वरून 85–95 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. महागठबंधनच्या जागांमध्ये घट होण्याचा अंदाज आहे. तर RJD ला फक्त 50–60 जागा मिळतील, म्हणजे 2020 पेक्षा मोठी घट मानली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस 15–20 जागांवर स्थिर आहे. डावे पक्ष (CPI-ML, CPI, CPM) 10–15 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तेजस्वी यादव यांनी बिहारमधील तरुणांना नोकरीचे मोठे आश्वासन दिले आहे. INDIA आघाडी सत्तेवर आल्यास जात-पात न पाहता सर्वांना नोकऱ्या मिळतील, असे म्हटले होते. मात्र याचं मतात परिवर्तन झाल्याचे दिसत नाही.
advertisement
JSP आणि इतर
प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष (JSP) चर्चेत होता. पण तो मतदारांपर्यंत पोहचलेला पाहायला मिळत नाही. सर्व एक्झिट पोलनुसार JSP ला 0 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा आहे की,
बिहारमध्ये अद्याप तिसऱ्या पर्यायासाठी जागा निर्माण झालेली नाही.
2020 विरुद्ध 2025 आकड्यांचा उलटफेर
2025 मध्ये NDA ने ज्या प्रमाणात मतदार परत मिळवले आहेत, तितक्याच प्रमाणात MGB ने गमावले आहेत. 2020 साली एनडीएमध्ये भाजप आघाडीचा चेहरा तर JDU दुय्यम स्थानी होता. 2025 मध्ये समीकरण उलटं झालं आहे. JDU आता NDA मधील सर्वात मोठा घटक ठरत असून, नितीश कुमार पुन्हा बिहारच्या सत्तेचा निर्णायक नेता बनले आहेत. त्यांचं नेतृत्व केवळ बिहारपुरतं मर्यादित नाही . राजकीय विश्लेषकांच्या मते, 2026–27 मध्ये NDA च्या राष्ट्रीय समीकरणातही नितीश यांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
advertisement
विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज
'बदल नव्हे, सातत्य आणि स्थैर्य हवे आहे', हा संदेश बिहारच्या मतदारांनी या वेळी स्पष्टपणे दिला आहे. NDA चं हे बहुमत म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवरील विश्वासाचं मत, तर महागठबंधनसाठी ही वेळ आत्मपरीक्षण आणि नवी रणनीती आखण्याचीआहे
view commentsLocation :
Patna,Bihar
First Published :
November 11, 2025 9:27 PM IST
मराठी बातम्या/देश/
Bihar Exit Poll: 20 वर्षानंतरही नितीश पुन्हा पुन्हा कसे येतात? अँटी इन्क्मबसी का नाही? 4 कारणांत दडलंय यशाचं गुपित


