पंचमी तिथीचा प्रारंभ 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:33 वाजता होईल, तर समाप्ती 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12:03 वाजता होणार आहे. या दिवशीचा अभिजीत मुहूर्त 11:48 ते 12:36 असा लाभदायी मानला गेला आहे.
advertisement
पूजा विधी
ललिता पंचमीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र धारण करावीत. व्रताचे संकल्प घेऊन पूजा स्थळी चौकीवर लाल वस्त्र पसरवून देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केली जाते. त्यानंतर लाल फुले, लाल वस्त्र, कुमकुम, रोली, अक्षत अर्पण करून देवीची पूजा केली जाते. या दिवशी ललिता सहस्त्रनाम व ललिता त्रिशती यांचे पठण अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
ललिता पंचमीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे रोग-दोष दूर होतात, आरोग्य लाभते, घरात सुख-समृद्धी वाढते आणि मनोकामना पूर्ण होतात, असा धार्मिक समज आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Lalita Panchami 2025 : ललिता पंचमी व्रत कुणी करावं? पूजा विधी आणि महत्त्व काय? संपूर्ण माहितीचा Video