याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पितृ पक्षात पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी फ्लॉवर, गवार, भेंडी, कारले, लाल भोपळा, वटाणा, कच्ची केळी आणि इतर भाजांची गरज भासते. सध्या बाजारात या भाज्यांची मागणी वाढली आहे. तर, सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. परिणामी एपीएमसीत भाज्यांची आवक कमी मागणी वाढली आहे.
Pitru Paksha: पितृपक्षातील श्राद्ध तिथी कोणत्या? काय आहे श्राद्धाचे महत्त्व? Video
advertisement
मेथी, पालक, कोंथिबीर आणि इतर पालेभाज्यांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ भाज्यांच्या दरावर कोणतंही नियंत्रण नसल्याने विक्रते दुप्पत ते तिप्पट दराने विक्री करत आहेत. मुंबई एपीएमसीतील भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला बाजारपेठेपर्यंत पोहचलेला नाही. भाजीपाला नियमन मुक्त असल्यामुळे बहुतांश विक्रेते मनाचा भाव लावून विक्री करतात.
भाज्यांचे घाऊक दर
फ्लॉवर 20 ते 32 रुपये गड्डा, वाटाणा 120 ते 150 रुपये किलो, गवार 60 ते 90 रुपये किलो, भेंडी 60 ते 80 रुपये किलो, कारले 45 ते 60 रुपये किलो, लाल भोपळा 20 ते 35 फोड, फरसबी 40 ते 50 रुपये किलो, घेवडा 40 ते 50 रुपये किलो. किरकोळ बाजारात हे दर यापेक्षा जास्त आहेत. पितृपक्षात भाज्यांचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. नवरात्रौत्सवात भाज्यांचे दर कमी होण्याचा अंदाज आहे.