Pitru Paksha: पितृपक्षातील श्राद्ध तिथी कोणत्या? काय आहे श्राद्धाचे महत्त्व? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
या काळात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तिथीनुसार पितरांचे श्राद्ध केले जाते. त्यापैकी काही तिथी विशेष मानल्या जातात.
अमरावती: हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा पितृपक्ष काळ अश्विन अमावास्येला समाप्त होतो. 2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर रोजी झाली असून तो 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावास्येला समाप्त होणार आहे. या काळात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तिथीनुसार पितरांचे श्राद्ध केले जाते. त्यापैकी काही तिथी विशेष मानल्या जातात. त्या नेमक्या कोणत्या याबाबत माहिती पुजारी येलकर महाराज यांनी दिली आहे.
पितृपक्षातील महत्त्वाच्या श्राद्ध तिथी कोणत्या?
याबाबत माहिती देताना पुजारी येलकर महाराज सांगतात की, पितृपक्षातील पहिली महत्त्वाची तिथी आहे अष्टमी श्राद्ध, जे 14 सप्टेंबर रोज रविवारला आहे. या दिवशी विशेषतः महिला पितरांचे श्राद्ध करण्याची प्रथा आहे. आई, आजी, पणजी किंवा कुठल्याही स्त्री पूर्वजांची आठवण करून पिंडदान केले जाते. श्रद्धेने केलेल्या या विधीमुळे घरातील स्त्रियांवर कल्याणकारी आशीर्वाद लाभतात, अशी श्रद्धा आहे.
advertisement
दुसरी महत्त्वाची तिथी आहे नवमी श्राद्ध, यालाच अविधवा नवमी असेही म्हणतात. हे श्राद्ध 15 सप्टेंबर रोज सोमवारला आहे. ही तिथी अविवाहित मुली, भगिनी किंवा अकाली मृत्यू झालेल्या सुवासिनी स्त्रियांसाठी खास मानली जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या श्राद्धाने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
तिसरी तिथी आहे एकादशी श्राद्ध. हे 17 सप्टेंबर रोज बुधवारला आहे. एकादशीला संन्यासी, ब्रह्मचारी आणि व्रतधारी पितरांचे श्राद्ध केले जाते. आयुष्यभर साधना किंवा धार्मिक आचरण केलेल्यांच्या आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी महत्त्वाची आहे. या दिवशी उपवासासह श्राद्ध विधी करणे श्रेष्ठ मानले जाते.
चौथी तिथी आहे चतुर्दशी श्राद्ध. हे 20 सप्टेंबर रोज शनिवारला आहे. या तिथीला अकाली मृत्यू पावलेले, अपघात, युद्ध किंवा अनैसर्गिक मृत्यू झालेल्या पितरांचे श्राद्ध केले जाते. अशा आत्म्यांचे शांत होणे कठीण मानले जाते, त्यामुळे या दिवशी केलेले श्राद्ध अत्यावश्यक मानले जाते.
advertisement
पाचवी आणि शेवटची तिथी आहे सर्वपित्री अमावस्या. ही 21 सप्टेंबर रोज रविवारला आहे. पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस. ज्यांच्या श्राद्धाची तिथी निश्चित माहीत नाही, अशा सर्व पितरांचे श्राद्ध या दिवशी केले जाते. संपूर्ण पंधरवड्यात जर कोणत्या दिवशी श्राद्ध करता आले नाही, तर या अमावास्येला ते करणे आवश्यक मानले जाते. हाच दिवस पितृपक्षाची सांगता दर्शवतो.
advertisement
पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना कृतज्ञतेने स्मरण करण्याचा काळ. धर्मशास्त्रानुसार, पितरांचे आशीर्वाद मिळाल्याने वंशवृद्धी, सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभते. या पंधरवड्यात कुटुंबाने मिळून श्राद्धविधी करणे, दानधर्म करणे आणि सात्विक आचार पाळणे हे सर्व कर्तव्य मानले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 10, 2025 7:05 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Pitru Paksha: पितृपक्षातील श्राद्ध तिथी कोणत्या? काय आहे श्राद्धाचे महत्त्व? Video