मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी मिळाला नवा पर्याय
मेट्रो 1 ही सर्वात पहिली मार्गिका 2014 साली सुरू झाली होती. गेल्या 11 वर्षांत या मार्गिकेवरून तब्बल 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता शिवाय प्रवाशांचा प्रतिसाद पाहता मेट्रोने विविध डिजिटल तिकीट खरेदीचे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वी प्रवाशांना व्हॉट्सअॅपद्वारे तिकीट खरेदी करता येत होते तसेच मेट्रो वन अॅपद्वारेही तिकीट काढता येते. पण आता उबेर अॅपद्वारेही मेट्रो 1 चे तिकीट खरेदी करता येईल.
advertisement
उबेर अॅपवर तिकीट खरेदी केल्याने प्रवाशांना वेळ वाचेल आणि तिकीटसाठी लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. हे नवीन डिजिटल पर्याय मेट्रो प्रवास अधिक सोपा आणि जलद करतील. याशिवाय प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी अनेक पर्याय असल्यामुळे ते आपल्या सोयीच्या पद्धतीने तिकीट घेऊ शकतात. डिजिटल तिकीट खरेदीमुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुकर आणि आरामदायक होईल.
