निवडणूक निकालानंतर भाजपने विरोधकांच्या किमान 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली असल्याचा दावा केला. तर आणखी 15 खासदारांची मते चुकीच्या पद्धतीने नोंदवल्यामुळे अवैध ठरली. त्यामुळे रेड्डी यांचा पराभव अधिक ठळक झाला. मात्र, त्या 15 अवैध मतांवर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. अवैध 15 मतांपैकी 10 मते ही एनडीएची असल्याचा दावा विरोधकांनी केला. तर, ही सगळी अवैध मते इंडिया आघाडीची असल्याचा जोरदार दावा सत्ताधारी गोटातून करण्यात आला आहे. विरोधकांची एकजूट ही फक्त घोषणाबाजी ठरली असल्याची टीका भाजपने केली आहे. निवडणुकीआधी भाजप नेतृत्वाने किमान 50-60 मते अधिक मिळतील असा दावा केला होता. मात्र, ही संख्या मर्यादित राहिली असल्याचे निकालातून दिसून आले. उपराष्ट्रपतीपदाच्या मतदानातून भारत राष्ट्र समिती, अकाली दल आणि बिजू जनता दल यांनी माघार घेतली होती. या तिन्ही पक्षाच्या खासदारांकडून
advertisement
एनडीएला क्राॅस व्होटिंगची रसद कुठून?
महाराष्ट्रातील ठाकरे गट आणि शरद पवारांच्या खासदारांची मते फुटल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातून एनडीएला अधिक मतांची रसद मिळाली. क्रॉस व्होटिंगचा संशय महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि पंजाबातील खासदारांवर व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील काही खासदार अलीकडेच एनडीएबाबत सकारात्मक बोलले होते, तर केरळ व पंजाबमधील काही नेते स्वतःच्या पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसले असल्याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
मतदान गुप्त स्वरूपाचे असल्याने क्रॉस व्होटिंगचे ठोस पुरावे समोर येणे कठीण आहे. तरीदेखील या निकालाने संख्याबळापेक्षा राजकीय गणित, अंतर्गत नाराजी आणि मतभेद यांचा प्रभाव ठळकपणे जाणवला.