साई संस्थानाने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा असंही सुजय विखेंनी म्हटलंय .व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास सर्वसामान्यांना दिवसभरात सुकर दर्शन घेता येईल असं विखे यांनी म्हटलंय. तिरुपतीच्या धर्तीवर शिर्डीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था करा, व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंतच दर्शन द्या अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी मागणी केली.
advertisement
दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा, सुजय विखेंची मागणी
सामान्य साईभक्तांना तासनतास दर्शन रांगेत उभं राहण्यापासून सुटका करण्यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर साईमंदिरात व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 या वेळेतच दर्शन द्यावे. त्यासाठी साई संस्थाने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे..
व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंतच दर्शनाची व्यवस्था
शिर्डीच्या साईमंदिरात व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा दर्शन रांगा थांबवल्या जातात त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. साईबाबा संस्थानने तिरुपतीच्या धर्तीवर व्हीआयपींना पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंतच दर्शनाची व्यवस्था करता येईल का? याबाबत विचार करावा अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे.. व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास सर्वसामान्यांना दिवसभरात सुकर दर्शन घेता येईल असं विखे यांनी म्हटलंय..