भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1) अन्वये राज्यपालांनी ही नियुक्ती केली असून, भीमनवार यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहा वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी होईल तोपर्यंत) ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.
अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 316 (1-क) नुसार डॉ. अभय एकनाथ वाघ, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
advertisement
कोण आहेत विवेक भीमनवार?
विवेक लक्ष्मीकांत भीमनवार हे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. भीमनवार हे २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेआधी त्यांनी एलएलबी आणि एमएससी पदवी संपादन केली. ते सध्या महाराष्ट्र शासनाचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी परिवहन विभागात अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी परिवहन आयुक्त म्हणून विवेक भीमनवार यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर बाईक टॅक्सीविरोधात कठोर पावले उचलली.
विवेक भीमनवार यांनी ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची वर्धा जिल्हाधिकारीपदी बदली झाली. आयकर विभागात काम करण्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.
