TRENDING:

Panvel: ID दाखवला आणि मतदानही झालं, पनवेलमध्ये 'भुताने' केलं मतदान, उमेदवारांच्या आरोपाने खळबळ

Last Updated:

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संतोष दळवी, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

पनवेल : महाराष्ट्रात २९ महापालिकांसाठी मतदान पार पडत आहे. पण, अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी मतदान केल्यानंतर बोटावरची शाई पुसली जात आहे. तर काही ठिकाणी दुबार मतदान झाल्याचं उघड झालं आहे. अशातच पनवेलमध्ये एका मृत व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे.

advertisement

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेकाप उमेदवार दीपक पाटील आणि अपक्ष उमेदवार अक्षय हाके यांनी आरोप केला की, मयत व्यक्ती मतदान करून गेला आहे.

"प्रभाग क्रमांक १० मध्ये जे मतदार मयत झाले आहे, त्यांना आम्ही मार्किंग करून दिलं आहे. पण, प्रस्तापित बोगस मतदान करत आहे. जे मयत झाले आहे, त्यांचे बनावट मतदान कार्ड तयार केले जात आहे. आतमध्ये जे पोलिंग एजंट आहे. त्यांनी हरकत घेतली नाही. केंद्रातील निवडणूक आयोगाचे कर्मचारी ते सुद्दा हरकत घेत नाही. पण आम्ही पुराव्यासह सांगतोय, मतदान केलेली व्यक्ती ही मयत झाली आहे. आमच्याकडे त्याचे प्रमाणपत्र आहे. आमची दखल घेतली नाही, असा आरोप उमेदवार दीपक पाटील यांनी केला आहे.

advertisement

तर, आम्ही मतदान केंद्रावर गेलो तर आम्हाला अरेरावीची उत्तरं दिली, मध्ये येऊ दिलं नाही. आम्ही आमचं बघतो असं सांगितलं. मतदार यादीवर व्यक्ती मयत झाला आहे, असं सांगितलं आहे. मग बोगस मतदान झालं कसं, हा काय प्रकार आहे? असा थेट सवाल अपक्ष उमेदवार अक्षय हाके यांनी केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वय 6 वर्ष, पुण्यातील मिहिराने रचला इतिहास, बनली भारतातील सर्वात तरुण वेटलिफ्टर
सर्व पहा

मात्र, मयत व्यक्तीच्या नावावर जे मतदान करण्यासाठी आले होते, त्यांनी ओळखपत्र आणि आयडी कार्ड  दिले असल्याचं प्रशासनाने त्यांना सांगितलं. मात्र, आम्ही स्थानिक येथील रहिवासी आहोत आम्हाला माहिती असल्याचे या दोन्ही उमेदवार यांचं म्हणणं आहे. या प्रकारावर मात्र, अजूनही निवडणूक कर्मचाऱ्यांकडून कोणताही खुलासा केला नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panvel: ID दाखवला आणि मतदानही झालं, पनवेलमध्ये 'भुताने' केलं मतदान, उमेदवारांच्या आरोपाने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल