पत्नी पाण्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी पतीने हे विहिरीत उडी मारली दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बीडच्या केज तालुक्यातील वाघे बाभूळगाव शिवारात घडली. यावेळी सोबत असलेल्या मुलाने परिसरातील शेतकऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले या प्रकरणी केज पोलिसांना नोंद करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
advertisement
पत्नीला वाचवताना तिने पतीला घाबरु मिठी मारली. तिची पकड इतकी घट्ट होती की सोडवणं कठीण झालं आणि दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वाघेबाभूळगाव परिसरात घडली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली होती. भास्कर विनायक पवार आणि अल्का पवार अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. ५ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे.
मुलगी दीक्षा पवार हिचे एक महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. लग्नसोहळ्याचे विधी आटपून थोडं आराम मिळाल्याने आता शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली होती. शेतात खुरपणी सुरू असताना अचानक तहान लागली म्हणून विहिरीवरुन पाणी आणायला पत्नी गेली आणि त्यानंतर घात झाला. पवार दाम्पत्याचा मुलगा धाराशिवमध्ये आयटीआयचे शिक्षण घेत आहे.
