मिळालेल्या माहितीनुसार, सलीम आणि निखिल या दोन तरूणांचे एकाच मुलीवर प्रेम होते.त्यामुळे काही काळापासून या मुलीवरून दोघांमध्ये वाद सूरू होते. आज हे दोघेही वर्ध्याच्या आर्वी शहरातील गांधी चौकात भेटले होते. या दरम्यान भांडणाचा वाद आज टोकाला पोहोचला होता. यावेळी सलीम आणि निखिल यांच्यात भंयकर बाचाबाची झाली.या बाचाबाची दरम्यान निखिलने आपल्याकडील धारदार शस्त्र काढून सलीमवर वार केले होते. हे वार इतके गंभीर होते की क्षणात समील रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. त्यानंतर ही घटना पाहून तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेला आणि गंभीररित्या जखमी झालेल्या सलीमला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत माळवली होती.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी निखिल बुरे यास अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आर्वी शहरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधी चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.