2017 पासून सुरू झाला एस्ट्रो क्लबचा प्रवास
एस्ट्रो क्लबचा प्रवास 12 ऑगस्ट 2017 सुरू झाला. एस्ट्रो क्लब तयार करताना महत्त्वाचा मुद्दा टेलिस्कोपचा होता. भारत सरकारने दिलेला 3 इंच रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप उपलब्ध होता. तरीही आम्हाला रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपची गरज होती. तीन इंच पेक्षा मोठा करायचा हाच एक उद्देश होता म्हणून सर्च केल्यावर 8 इंच रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप चांगला राहील हे लक्षात आलं. रिफ्रॅक्टींग आणि रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप मध्ये बराच फरक आहे. रिफ्रॅक्टींग टेलिस्कोप मध्ये भिंगाच्या आरपार प्रकाश ट्रॅव्हल करतो. पण रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये भिंग नसतो तर काच असतो, असे डॉ. टिपले सांगतात.
advertisement
दिव्यांग तरुणाच्या कल्पकतेचा जगभर डंका, मूकबधिर मुलांचं शिक्षण झालं सोप्पं, Video
घरचा मिरर प्लेन असतो तर हा कर्व्ह असतो. त्याचबरोबर याचे फर्स्ट सरफेस कोटिंग असते. घरच्या मिरर मध्ये काच असतो आणि काचेच्या मागे कोटिंग केलेली असते. येथे याच्यावर फ्रंट सरफेस वर कोटिंग असते. त्या फ्रंट सरफेसर कोटिंग असल्यामुळे आपल्याला क्लियरिटी फार चांगली लाभते.हा टेलिस्कोप फायदेशीर होता त्यामुळे आम्ही हा टेलिस्कोप बनवला, असं एस्ट्रो क्लब चे समनव्यक डॉ.सुधीर टिपले सांगतात.
एस्ट्रो क्लबचा विद्यार्थीच सांभाळतात कार्यभार
एस्ट्रो क्लब सेल्फ फंडेड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विद्यार्थी क्लब आहे. म्हणजे डॉ.सुधीर टिपले हे टीचर इन्चार्ज आहेत. तरीही क्लबचे काम फक्त आणि फक्त विद्यार्थीच सांभाळतात. विद्यार्थ्यांमधून दरवर्षी पदाधिकारी नेमून दिलेले असतात. त्यानुसार ते काम सांभाळतात, असे टिपले यांनी सांगितलं.
मसूर डाळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही उपयुक्त, असा करा उपयोग, Video
विद्यार्थी आता करतोय नैनिताल येथे पीएचडी
या टेलिस्कोपला साकार करण्यासाठी पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं योगदान आहे. त्यातील कार्तिक गोखे हा विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था, नैनिताल येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्समध्ये पीएचडी करतोय. त्याने हा कौतुकास्पद टेलिस्कोप बनविलेला होता. त्यामुळे त्याचं सिलेक्शन झालं याचं कौतुक सर्व शिक्षक करतात.
विद्यार्थ्यांनी बनविलेला मोठा, पहिलाच टेलिस्कोप?
हा टेलिस्कोप जेव्हा आम्ही बनवला आमच्या माहितीनुसार त्यावेळेसचा हा विदर्भातला सगळ्यात मोठा टेलिस्कोप होता. त्यानंतर रमण सायन्स सेंटर नागपूर यांनी आमच्यापेक्षा मोठा टेलिस्कोप प्रोक्युर केला. पण जर का विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टेलिस्कोपचा विचार केला किंवा कॉलेजमध्ये एवढा मोठा टेलिस्कोप, माझ्या माहितीनुसार तरी विदर्भात किंवा किंबहुना महाराष्ट्रात नसेल असा अंदाज डॉ. टिपले यांनी व्यक्त केला.
हजारो लोकांनी बघितला टेलिस्कोपमधून चंद्र
एफ बाय सेवन हा टेलिस्कोप आहे. याचा ऑब्जेक्टइव्हचा डायमिटर आणि फोकल लेंथ एफ बाय सेवन या रेशव मध्ये असतो. त्यामुळे डीप स्पेस एक्सप्लोरेशन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. या टेलिस्कोपने अनेक कार्यक्रमही घेतलेले आहेत. जसे की एक मेगा इव्हेंट 31 जानेवारी 2018 ला सुपर ब्ल्यू मून सोबतच आणि सुपर रेड म्हणून देखील आम्हाला पाहायला मिळाला होता. या तारखेला आम्ही वर्धेकरांना चंद्राचे दर्शन करून दिलेय. त्यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, मित्रमंडळी अशाप्रकारे अंदाजे 3 हजार लोकांनी लाभ घेतला. त्याचबरोबर या टेलिस्कोपने आम्ही चंद्र दर्शन, शनी दर्शन आणि गुरु या ग्रहांचे दर्शन देखील केले आहे. त्या टेलिस्कोपला अभ्यासण्यासाठी बघण्यासाठी इतर शाळेचे विद्यार्थी भेटी देतात यापुढे देखील विद्यार्थ्यांकरीता हा टेलिस्कोप उपयोगात आणला जाईल, असे डॉ. सुधीर टिपले यांनी सांगितले.