advertisement

'तू आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र संबंध ठेवायचेत', वर्ध्यात राजकीय नेत्याकडून कॉलेज तरुणीचं लैंगिक शोषण

Last Updated:

Divakar Game Wardha News: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका राजकीय नेत्याने २१ वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे.

News18
News18
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका राजकीय नेत्याने २१ वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. नोकरीचं आमिष दाखवून आणि शिक्षणात मदत करण्याच्या बहाण्याने संबंधित राजकीय नेता सातत्याने अश्लील मेसेज करत होता, अभद्र बोलत होता, असा आरोप तरुणीने केला आहे. मागील पाच वर्षांपासून सातत्याने हा प्रकार सुरू होता, असंही तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. ज्यावेळी हा प्रकार सुरू झाला, तेव्हा पीडित तरुणी १७ वर्षांची होती, त्यामुळे पुलगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिवाकर गमे असं गुन्हा दाखल झालेल्या ७८ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी संबंधित असल्याची माहिती आहे. आरोपी दिवाकर गमे हा मागील पाच वर्षांपासून पीडितेकडं लैंगिक सुखाची मागणी करत होता. यासाठी तो पीडितेला गोड बोलून NEET परीक्षेचे क्लासेस लावण्याच्या बहाण्याने नाशिकला घेऊन गेला होता. याठिकाणी एकत्र राहून त्याने पीडितेकडं शरीरसंबंधाची मागणी केली होती. पण पीडितेनं विरोध केला, असंही तिने तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement

पाच वर्षांपासून सुरू होता छळ

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी दिवाकर गमे हा गेल्या पाच वर्षांपासून तिच्याशी अशोभनीय वर्तन करत होता. पीडितेने आरोप केला आहे की, आरोपीने तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात तिच्याशी असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली. केवळ इतकेच नाही, तर आरोपी तिला अश्लील फोटो, व्हिडिओ आणि अभद्र मेसेज पाठवून सातत्याने मानसिक त्रास देत होता. तसेच पॉर्न वेबसाईटवरील लिंक्स पाठवून, त्याप्रमाणे आपण शरीरसंबंध ठेवू, असंही आरोपी पीडितेला सांगायचा, असा आरोप पीडितेनं केला आहे.
advertisement

'तू आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र संबंध ठेवायचेत'

एवढंच नव्हे तर आरोपी पीडितेसह तिच्या अन्य एका मैत्रिणीसोबत एकत्रित शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. आपल्याला दोघांशी एकत्र संबंध ठेवायचे आहेत, अशी तो मागणी करत होता. याबाबत जेव्हा पीडितेनं आपल्या कुटुंबीयांना सांगितलं. तेव्हा कुटुंबीयांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही. घरच्यांनी आपल्याला घर सोडून जाण्यास भाग पाडलं. तेव्हापासून आपण मैत्रिणीकडे राहत असल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. तरीही आरोपी गमेचा त्रास कमी होत नव्हता.
advertisement

पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पीडितेने अखेर या त्रासाला कंटाळून पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ हालचाली करत दिवाकर गमे याच्याविरुद्ध विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हिंगणघाट येथून आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
advertisement

राजकीय वर्तुळात खळबळ

दिवाकर गमे हे ज्येष्ठ राजकीय नेते असून एका मोठ्या पक्षाशी संबंधित असल्याने या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नोकरीच्या नावाखाली तरुणींचे शोषण करण्याच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुलगाव पोलीस करत असून, यामध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, गमे यांनी पीडितेनं केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला खोट्या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तू आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र संबंध ठेवायचेत', वर्ध्यात राजकीय नेत्याकडून कॉलेज तरुणीचं लैंगिक शोषण
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement