या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अल्पवयीन मुलीचा मागील सहा दिवसांपासून कोणताही सुगावा लागलेला नाही. या घटनेमुळे केवळ प्रशासनावरच नव्हे तर बाल संरक्षण यंत्रणेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाशिमच्या दिशा मुलींच्या निरीक्षणगृहात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी १४ जूनपासून अचानक फरार झाली. फरार होण्याच्या दिवशी दुपारी ती निरीक्षणगृहाच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळत घालण्याच्या बहाण्याने गेली. त्यानंतर ती खाली गॅलरीत आली आणि काही कळायच्या आत तिने १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारली आणि पळून बाहेर गेली. तेव्हापासून तिचा कोणताच पत्ता लागलेला नाही.
advertisement
पोलीस आणि बाल संरक्षण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत यामध्ये कोणतेही ठोस यश मिळालेले नाही. जर संरक्षित संस्थांमध्येही मुली सुरक्षित नसतील तर यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला असून अशा मुलींच्या संरक्षित निरीक्षण गृहांची सुरक्षा मजबूत करण्याची गरज आहे.
आमच्या संस्थेत १३ जून २०२५ रोजी त्या मुलीचा आमच्याकडे प्रवेश झाला होता. काळजीवाहकाची नजर चूकवून संबंधित मुलगी १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून निघून गेली. यानंतर काळजीवाहकाने फोन करून घडलेली घटना मला सांगितली. मी देखील लगोलग मुलींच्या निरीक्षणगृहात आले. आम्ही आजूबाजूच्या परिसरात, बस स्थानकावर शोधाशोध केली. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात गेलो. त्यावेळी २४ तास आहेत, आधी शोधाशोध करू, असे पोलिसांनी सांगितले. १४ तारखेला मात्र आम्ही एफआयआर नोंदवला. सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे, असे वाशिमच्या दिशा मुलींचे निरीक्षणगृहाच्या अधीक्षक रेखा भुरके यांनी सांगितले.