राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअस पेक्षा खाली पोहोचला असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं. अहमदनगरच्या जेऊर इथं १०.१ अंश सेल्सिअस तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये ११.५ आणि निफाडमध्ये ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
Health Tips : हिवाळ्यात मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी या 5 फळांचा ज्युस द्याच!
advertisement
उत्तर भारताता तापमानाचा पारा बराच खाली घसरला आहे. पंजाब, हरयाणा, चंडिगड, दिल्ली या राज्यात तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. पंजाबच्या अमृतसर आणि लुधियानामध्ये सर्वात निचांकी ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2023 8:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, मुंबई-पुणे गारठले; या ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद