TRENDING:

Udayanraje Bhosale: उदयनराजेंच्या टार्गेटवर पुन्हा शरद पवार, विचारले 3 कडक सवाल

Last Updated:

'यशवंतराव चव्हणांच्या विचारांचं काय झालं. सगळी कामं मार्गी लावण्याचं काम महायुतीनं केलं. महायुतीच्या पत्रकार परिषदेत रिपोर्टकार्ड दिलं, पण...'

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(उदयनराजे विरुद्ध शरद पवार)
(उदयनराजे विरुद्ध शरद पवार)
advertisement

सातारा: 'शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ आहेत. एवढे वर्ष हातात सत्ता होती मुख्यमंत्री होता. मग त्यांनी त्या काळात ती कामं मार्गी लावली नाहीत. तुम्ही का कामं केली नाहीत? तुम्ही माणसांना वंचित ठेवलं, लोकांना सधन होवू दिलं नाही, असं म्हणत भाजपचे खासदार उदयनराजेंनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पहिला बार उदयनराजेंनी उडवला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून उदयनराजेंनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

advertisement

शरद पवारांचे दौरे जिल्ह्यात वाढले आहेत. हे का वाढले आहेत याविषयी त्यांनी विचार करावा. त्यावेळेस विकास कामे मार्गी लागली असती तर हे दौरे करावे लागले नसते. कोणतीही विकास कामे त्यांच्याकडून झालेली नाहीत. कृष्णा खोरे महत्वकांक्षी योजना होती पश्चिम महाराष्ट्रात बालेकिल्ला म्हणून काँग्रेस होता, असे शरद पवार सांगतात मग विषय का मार्गी लागले नाहीत, असा सवालच उदयनराजेंनी पवारांना विचारला आहे.

advertisement

(भाजपला पुन्हा धक्का? शरद पवारांच्या गळाला महाराष्ट्रातलं आणखी एक घराणं!)

'यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा ठामपणे म्हणणाऱ्यांचं काय झालं. यशवंतराव चव्हणांच्या विचारांचं काय झालं. सगळी कामं मार्गी लावण्याचं काम महायुतीनं केलं. महायुतीच्या पत्रकार परिषदेत रिपोर्टकार्ड दिलं असं या अगोदरच्या सरकारणं जाहीर केलं का? मराठा आरक्षणाबाबत तुम्ही बोलला नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही पहिल्या पासून सगळं पाहत आहात. आरक्षणावर तुम्ही तेव्हा का बोलला नाही, असंही उदयनराजे म्हणाले.

advertisement

'व्हीपी सिंग सरकारणं मंडल आयोग लागू केल्यानंतर तुम्ही त्यावर बोलला नाहीत. तेव्हा जाळपोळ भोकसा भोकसी सुरू होती. मग तेव्हा काहीच का केलं नाही. मराठा आरक्षणाबाबत तुम्ही भाष्य केलं नाही. मराठ्यांसह आर्थिक दृष्ठ्या दुर्बल आहे. त्या सगळ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण तुम्ही फक्त बॅकवर्ड क्लाससाठीच केलं, असा आरोपही उदयनराजेंनी केला.

'सगळ्याच जातींच्या आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळावं. याच लोकांनी जाती जातीत तेढ निर्माण करण्याचं काम केलं, अशी टीकाही उदयनराजेंनी विरोधकांवर केली.

advertisement

महायुतीच्या उमेदवारासाठी महाराष्ट्रभर फिरणार?

'आम्ही दोघांनी महायुतीच्या माध्यमातून विकास कामे केली आहे. त्यांनी याच विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाणार आहे. भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी जिल्ह्यात फिरणार. अगदी महाराष्ट्रात फिरण्याची वेळ आली तरी फिरणार. महायुतीचे आमदार महाराष्ट्रात निवडून येणार असा मला विश्वास आहे. लाडकी बहिण योजनेवर टीका केला जात आहेत. सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. या सरकारच्या माध्यमातून योजना मार्गे लागल्या या त्यांनी का मार्गी लावल्या नाहीत. स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं तर ते बघवत नाही. नाव ठेवण्यापलीकडे यांना काही जमत नाही, असा टोलाही उदयनराजेंनी विरोधकांना लगावला.

'सर्व गोष्टी राजकीय होणार असतील तर त्याला अर्थ नाही'

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

'गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी कृष्णा खोरेचे त्यावेळी विषय मार्गी लावले. महायुतीने पत्रकार परिषदेत रिपोर्ट कार्ड जाहीर केलं, असं शरद पवारांनी केलं का? कारण त्यांनी केलेच नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा शरद पवारांच्या हातात असताना का मार्गी लावला नाही. शरद पवार मराठा आरक्षणाबाबत 23 मार्च 1994 चे भाष्य का करत नाहीत. संविधान बदलाबाबत म्हटलं जायचं पण या संविधानाला अधीन राहूनच सर्व केलं पाहिजे. जे करू शकत होते त्यांनी का केलं नाही. 23 मार्च 1994 मध्ये 16 टक्के आरक्षण का दिलं नाही. मनोज जरांगे पाटील यांना मी त्यावेळेस सांगितलं आहे. या सर्व गोष्टी राजकीय होणार असतील तर त्याला अर्थ राहणार नाही, असंही ते म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Udayanraje Bhosale: उदयनराजेंच्या टार्गेटवर पुन्हा शरद पवार, विचारले 3 कडक सवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल