TRENDING:

Hingoli : लग्नाला 2 महिने झाले, तरुणीनं स्वत:ला संपवलं; बहिणीच्या नवऱ्याला पाठवला शेवटचा मेसेज

Last Updated:

आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना मयत महिलेने फोनवर मेसेज करून कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनीष खरात, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

हिंगोली : हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नंदिनी प्रतीक करवा असे मयत महिलेचे नाव असून ही महिला वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील रहिवासी आहे. आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना मयत महिलेने फोनवर मेसेज करून कळविले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे. तिने बहिणीच्या नवऱ्याला केलेला शेवटचा मेसेज समोर आलाय. त्यात आपल्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नये असं म्हणत दुसरं कारण असल्याचा उल्लेख केला आहे.

advertisement

संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या नंदिनी विरेंद्र तिवारी हिचं दोन महिन्यांपूर्वीच रिसोड इथल्या प्रतिक कारवा सोबत लग्न झालं होतं. तर काही दिवसांपूर्वी नंदिनी तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली होती. पण शनिवारी सकाळी अचानक घरातून निघून गेल्यानंतर ती लवकर परतली नाही. तेव्हा कुटुंबिय तिचा शोध घेत होते.

लेकीला पुण्याचं स्थळ बघून दिली, पतीने मित्रांसोबत संबंध ठेवायला सांगितलं, नकार देताच केली मारहाण

advertisement

सकाळी घरातून गेल्यानंतर नंदिनीने तिच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला. त्यात तिनं आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलंय. तिने शहरातील एका लॉजवर रूममध्ये गळफास घेत जीवन संपवलं. पख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.

काय म्हटलंय शेवटच्या मेसेजमध्ये

दिदी तू खूप सपोर्ट केलास, मी खूप प्रयत्न केला पण माझ्याकडून काहीच होत नाहीय. मी फक्त माझ्यासाठी हे पाऊल उचलतेय. यात कुणाचीच चूक नाही. माझ्या पतीनेही मला चांगली साथ दिली. पण मी दुसऱ्या काही कारणाने चांगली राहू शकत नाही असा उल्लेख शेवटच्या मेसेजमध्ये नंदिनीने केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hingoli : लग्नाला 2 महिने झाले, तरुणीनं स्वत:ला संपवलं; बहिणीच्या नवऱ्याला पाठवला शेवटचा मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल