TRENDING:

Kolhapur : फोटोचो मोह महागात पडला, पहिल्या क्लिकआधीच 35 तोळे सोनं गायब, कोल्हापूरचा Live Video

Last Updated:

फोटो काढण्याचा मोह महिलेला चांगलाच महागात पडला आहे. कोल्हापूरमधल्या एका लग्न समारंभात या महिलेला फोटो काढण्याचा आता पश्चाताप होत असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर, 20 डिसेंबर : फोटो काढण्याचा मोह महिलेला चांगलाच महागात पडला आहे. कोल्हापूरमधल्या एका लग्न समारंभात या महिलेला फोटो काढण्याचा आता पश्चाताप होत असेल, कारण काही सेकंदांसाठी पर्स बाजूला ठेवली आणि ही महिला 35 तोळ्यांच्या दागिन्यांना मुकली आहे. लग्न समारंभात वऱ्हाडी म्हणून आलेल्या चोरट्याने पर्समधील सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने, रोख आठ हजार रुपये आणि मोबाईल असा 24 लाख रुपये किंमतीचा ऐवज हातोहात लांबवला आहे.
फोटोचो मोह महागात पडला, पहिल्या क्लिक आधीच 35 तोळे सोनं गायब, कोल्हापूरचा Live Video
फोटोचो मोह महागात पडला, पहिल्या क्लिक आधीच 35 तोळे सोनं गायब, कोल्हापूरचा Live Video
advertisement

कोल्हापूरच्या शिरोली नाक्याजवळील एका मंगल कार्यालयात ही चोरीची घटना घडली आहे. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचेच्या विकरांवर गुणकारी, घरीच बनवा सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक साबण, Video
सर्व पहा

लग्न समारंभात आलेली ही महिला फोटो काढण्यासाठी उभी राहिली, त्याचवेळी तिने तिच्या हातात असलेली पर्स शेजारी ठेवली, त्याचवेळी चोरट्याने क्षणाचाही विलंब न लावता पर्स घेतली आणि कार्यालयातून पळ काढला. या पर्समध्ये जवळपास 35 तोळे सोनं, 8 हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल असा जवळपास 24 लाख रुपयांचा ऐवज होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur : फोटोचो मोह महागात पडला, पहिल्या क्लिकआधीच 35 तोळे सोनं गायब, कोल्हापूरचा Live Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल