महिलांना मोलमजुरी करायला घेऊन एक ट्रॅक्टर नांदेडच्या आलेगावकडे निघाला. पण या सकाळी ९ च्या सुमारास नियतीनं आपला वेगळाच खेळ खेळला. ट्रॅक्टर चालकाला अंदाज चुकला, नियंत्रण सुटलं आणि संपूर्ण ट्रॅक्टर थेट खोल विहिरीत कोसळला. अख्खा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, या भीषण अपघातात 8 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
शेतात राबणारे हात आज जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. काहींचं नशिब चाललं नाही. या भयावह दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यांनी सकाळी घर सोडलं, त्यांनी पुन्हा परतणं पाहिलं नाही. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे, पण जखम केवळ शरीराला नाही, ती घराघरात, हृदयात खोलवर कोरली गेली आहे. चार पैसे कमवण्यासाठी, घर चालवण्यासाठी त्या निघाल्या होत्या. पण काळाने त्यांना थांबवून टाकलं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण आलेगावात शोककळा पसरली आहे.