मूकबधिर तरुणाने लघुशंका पार्किंगच्या जागेत केल्याने हा वाद सुरू झाला व त्यातून त्याला बेदम सात ते आठ जणांनी मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून एवढेच नाही तर त्याला हाताला बांधून पोलीस स्टेशनला देखील घेऊन गेले असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबांनी दिली. या मारहाणीत राजेश गंभीर जखमी झाला असून त्याचे शरीर काळेनिळे पडले आहे. सोडवण्यासाठी गेलेल्या राजेशची आई, मावशी आणि बहिणीलाही आरोपींनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली.
advertisement
तरुणाला मारहाण झाल्यानंतर पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात
दरम्यान मूकबधिर तरुणाला मारहाण झाल्यानंतर पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास विलंब केला. योगायोगाने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. अमोल जाधव यांनी ही बाब मंत्र्यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रतापराव जाधव यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक मांजरे यांना फोन लावून जाब विचारला.
मंत्र्यांचा फोन अन् सूत्रे हलली
मंत्र्यांचा फोन येताच सूत्रे हलली आणि रात्री उशिरा याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 118(1), 115 (2), 190,191(2), 191(3), 92 आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ (कलम ९२) अन्वये १. सुरज हरिश्चंद्र जगदाळे २. प्रतिक जगदाळे ३. गणेश जगदाळे ४. राजाभाऊ देशमाने ५. शंतनू नरवडे (सर्व रा. तुळजापूर खुर्द)या 5 आरोपीवर गुन्हा (क्र. ०५२३/२०२५) गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
