TRENDING:

पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, सरावाला जाण्यासाठी बूट घालताना घडलं दुर्दैवी; 18 वर्षाच्या तरूणाचा दारातच जीव गेला

Last Updated:

कूलरचा शॉक लागून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्यात घडली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अकोला : महाराष्ट्र सध्या प्रचंड तापलाय. तापमानाचा उद्रेक होत असून आता कमाल तापमान चाळसीपार गेल्याचे चित चित्र आहे. राज्यात सर्वाधिक तापमान हे विदर्भात असून वाढत्या गरमीपासून दिलासा मिळण्यासाठई एसी, कूलरचा वापर वाढला आहे. मात्र याच कूलरचा शॉक लागून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्यात घडली आहे. अकोल्यातील सरप येथे ही घटना घडली आहे.
News18
News18
advertisement

समोर आलेल्य माहितीनुसार, रोहित विठ्ठल बावस्कर (१८ वर्षे) असे मृत तरूणाचे नाव आहे. रोहित हा पोलीस भरतीसाठी रोज सकाळी सराव करत असे. रविवारी देखील नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी झोपेतून उठला. सर्व तयारी केली त्यानंतर बाहेर सरावासाठी जाण्यासाठी तो पायात बूट घालत असताना त्याला कुलरचा शॉक बसला, हा शॉक इतका जबर होता की रोहितचा जागीच मृत्यू झाला आहे.

advertisement

शॉक बसून त्याचा जागेवर मृत्यू

वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी डेझर्ट कुलर म्हणजे पत्री- लोखंडी कुलर बनवण्याकडे नागरिकांचा असतो. वजनाने जड, पत्र्याचे आवरण, पाणी टिकून ठेवणाऱ्या गवताच्या जाळ्या कुलरला लावलेल्या असतात. हाच कुलर रोहितच्या घरी देखील होता. रात्री गरम होत असल्याने कुलर लावला होता. दरम्यान या कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेलला असताना बूट घालत असताना स्पर्श झाला आणि रोहितला शॉक बसून त्याचा जागेवर मृत्यू झाला.

advertisement

कुलरचा शॉक लागून जवळपास ९ जणांचा मृत्यू

पत्री कुलर लावताना काळजी घेतली जात नाही. यामुळे विजेचा झटका बसून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. गेल्या वर्षी अकोला जिल्ह्यात मागील वर्षात कुलरचा शॉक लागून जवळपास ९ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षात कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कुलर वापरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, सरावाला जाण्यासाठी बूट घालताना घडलं दुर्दैवी; 18 वर्षाच्या तरूणाचा दारातच जीव गेला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल