आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणुका अवघ्या दोन आठवड्यावर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी बंडखोरी केली आहे.जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्याने प्रचंड नाराज असून आम्ही फक्त झेंडा आणि माईक घेऊन सभा गाजवायच्या का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आम्हाला उमेदवारी देताना का डावललं जातय, असा संतप्त सवाल देखील त्यांनी पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांना केला आहे.
advertisement
शीतल फराकटे काय म्हणाल्या?
आम्ही फक्त झेंडा आणि माईक घेऊन सभा गाजवायच्या का? सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्यासाठी आम्हाला नेते मंडळी कधीच स्थान देणार नाही का? असा प्रश्न आता आमच्या मनात येत आहे. माझी लढाई ही कोणाच्या विरोधात नाही. पण माझी जनता, माझा युवक-युवती वर्ग, शेतकरी, वंचित बहुजन समाज, माय माऊली असेल त्यांच्या विकासासाठी धोरण त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे फराकटे म्हणाले.
मनधरणी करण्यासाठी कसरत करावी लागणार
उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्षाकडे आलेल्या आयारामांना प्राधान्य देत त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता बंडखोरी रोखण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर उभे ठाकले आहे. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मु दत 27 जानेवारी आहे. माघारीसाठी सात दिवस असल्याने बंडखोरी करून अर्ज भरलेल्यांची मनधरणी करण्याची कसरत करावी लागणार आहे.
12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे.
हे ही वाचा :
