अजितदादांची धास्ती, ज्यांना महापालिकेला हाडतूड केलं त्यांनाच भाजप जिल्हा परिषदेला गोंजारणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
भाजपने शनिवात्री रात्री शिवसेनेशी युतीची चर्चा केली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सर्वच पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे अवघ्या 20 दिवसांच्या कालावधीमध्ये उमेदवार निवडीपासून ते फॉर्म दाखल करून प्रचारा यंत्रणा राबवायची आहे. त्यामुळे महापालिकांचे निकाल जाहीर होताच पुण्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या डावपेचांना वेग आला आहे. भाजपने शनिवात्री रात्री शिवसेनेशी युतीची चर्चा केली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुणे जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतरही भाजप विचारपूर्वक पाऊल टाकत आहे. अजित पवारांचा ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा मतटक्का लक्षात घेता या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेनेने युतीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचीर बैठक झाली.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी युतीसंदर्भात मुरलीधर मोहोळ, विजय शिवतारे, चंद्रकांत पाटील, राजेश पांडे आणि राहुल कुल यांनी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्या बैठकीत मोहोळ आणि पाटील यांनी जिल्ह्यातील निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते. राज्य निवडणूक आयोगाकडून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
advertisement
अजित पवार भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याची तक्रार
मोहोळ आणि पाटील या दोघांनीच स्वबळाचा नारा दिला असला, तरी त्या बैठकीत अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील भाजपाची परिस्थिती मांडली. जिल्ह्यात अजित पवार हे बळाचा वापर करून भाजपच्या कार्यकत्यांना त्रास देत आहे, अशी तक्रार देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
जागावाटपाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा
एकीकडे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्ह्यात भाजप स्वबळाचा नारा देत असले, तरी दुसरीकडे कार्यकर्ते, नेते मात्र अजित पवारांना कसे तोंड द्यायचे या विचारात आहेत. दरम्यान, कालपर्यंत स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपने महायुतीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. जागावाटपाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
advertisement
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांची धास्ती, ज्यांना महापालिकेला हाडतूड केलं त्यांनाच भाजप जिल्हा परिषदेला गोंजारणार







