पगार मंजुरीसाठी खुलेआम ‘रेटकार्ड’, स्वतःसाठीच नाही, वरिष्ठांसाठीही लाच; एसीबीच्या कारवाईने खळबळ

Last Updated:

उच्च शिक्षण विभागातील एका वरिष्ठ कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा गंभीर आरोप झाल्याने शहरांत एकच खळबळ उडाली आहे.

‎एसीबीचा सापळा हुकला तरी लाच मागणी उघड; उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गुन्हा
‎एसीबीचा सापळा हुकला तरी लाच मागणी उघड; उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर: उच्च शिक्षण विभागातील एका वरिष्ठ कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा गंभीर आरोप झाल्याने शहरांत एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरातील उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयात कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी संजय मार्तंड जगताप यांच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) तक्रारीवरून करण्यात आली आहे.
‎तक्रारीनुसार, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका प्राध्यापकाचा वेतन निश्चितीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संजय जगताप यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एसीबीने सापळा रचला होता. मात्र, कारवाईदरम्यान संशय आल्याने जगताप यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सापळा यशस्वी होऊ शकला नाही. ‎प्रकरण पुढे आल्यानंतर जगताप यांनी वैद्यकीय रजा घेत कार्यालयातून अनुपस्थिती दर्शवली.
advertisement
शिवाय, अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केल्याची माहिती समोर आली. दरम्यान, संबंधित प्राध्यापकानेही तक्रार पुढे नेण्याबाबत अनिच्छा दर्शवली. मात्र, लाचेची मागणी स्पष्टपणे समोर आल्याने एसीबीने स्वतः पुढाकार घेत वेदांतनगर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. ‎बीड येथील एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. त्यानुसार, संजय जगताप यांनी स्वतःसाठी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लाच मागितल्याचे नमूद करण्यात आले आहे.
advertisement
वेतन निश्चितीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रति प्रस्ताव 15 ते 20 हजार रुपये घेतल्याशिवाय काम होत नसल्याची तक्रार प्राध्यापकाने केली होती. या प्राध्यापकासह आणखी तिघांचे वेतन निश्चिती प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एकूण 45 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीनंतर 30 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. ‎लाच मागणीच्या पडताळणीदरम्यान जगताप यांना संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारले नाहीत व तेथून निघून गेले. त्यानंतर पुन्हा सापळा रचण्यात आला, मात्र त्यातही ते अडकले नाहीत.
advertisement
पुढील काळात त्यांनी संबंधित प्राध्यापकासह तिघांचे काम कोणतीही रक्कम न घेता पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय रजा टाकून स्वतःला अनुपस्थित ठेवले. सध्या त्यांचा मोबाइल बंद येत असल्याची माहिती असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ‎या सर्व घडामोडीनंतर एसीबीने स्वतःहून वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविणा यादव करीत आहेत. या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पगार मंजुरीसाठी खुलेआम ‘रेटकार्ड’, स्वतःसाठीच नाही, वरिष्ठांसाठीही लाच; एसीबीच्या कारवाईने खळबळ
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement