ग्लोबल ट्रेड वॉरचा तडाखा: 27 फेब्रुवारीला अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोच्या आयात शुल्कावर 25% वाढीची घोषणा केली. ही नवीन करप्रणाली 4 मार्चपासून लागू होणार आहे. शिवाय चीनच्या मालावर 10% अतिरिक्त शुल्क लावण्याचा इशाराही दिला. या घोषणेमुळे जागतिक व्यापार युद्ध तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला.
advertisement
आशियाई बाजार कमकुवत: भारतातील बाजार कोसळण्यामागे आशियाई शेअर बाजारातील घसरणही कारणीभूत ठरली. हाँगकाँगच्या बाजारात मोठी पडझड झाली आहे. ट्रम्प यांच्या नवीन कर जाहीरनाम्यानंतर गुंतवणूकदारांनी टेक शेअर्समध्ये मोठी विक्री केली, यामुळे जपानी बाजारही कोसळले.
एनव्हिडियाच्या खराब तिमाही निकालांचा प्रभाव: अमेरिकेतील मोठी टेक कंपनी Nvidia हिने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. मात्र, हे निकाल अपेक्षेपेक्षा कमी होते. याचा परिणाम Nikkei इंडेक्सवर झाला आणि तो 5 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला. याचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय बाजारावरही झाला.
अमेरिकन अर्थव्यवस्था संकटात?: अमेरिकेच्या IT इंडेक्समध्ये 4% घसरण झाल्यामुळे चिंता वाढली आहे. बेरोजगारीच्या नव्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत नोकऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे. तसेच, ट्रम्प यांच्या नव्या करसंबंधी निर्णयामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
भारताच्या GDP डेटाची प्रतीक्षा: आज भारताची तिसऱ्या तिमाहीची (Q3) GDP वाढ दर जाहीर होणार आहे. मागील तिमाहीत 5.4% घट झाल्यानंतर आता 6.3% वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आकडे अपेक्षेप्रमाणे न आल्यास बाजारात आणखी मोठी घसरण होऊ शकते.
गुंतवणूकदारांनी काय करावे?: तज्ञांनी अत्यंत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. बाजारातील अस्थिरता पाहता नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात विक्रीचा सत्र सुरू असल्याने, अल्पकालीन गुंतवणूकदारांनी जोखीम घेऊ नये, असा इशारा दिला आहे.