केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोबाईल घेणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मोबाईलच्या किंमती कमी होतील. एखाद्या फोनची किंमत २० हजार रुपये असेल तर त्यावर २० टक्के सीमा शुल्क आकारला जायचा. त्यामुळे ४ हजार सीमा शुल्क लागल्यानं फोनची किंमत २४ हजार होईल. पण आता ५ टक्के कपात झाल्यानं सीमा शुल्क ३ हजार रुपये इतका होईल. यामुळे २४ हजार रुपयांना मिळणारा फोन २३ हजार रुपयांना मिळेल.
advertisement
Budget 2024: 'हम लोग दुश्मन नही, दोस्त है' बजेटवर नोकरदारांकडून मीम्सचा पाऊस
चार्जरच्या किंमतीही कमी होणार आहेत. मोबाईल फोनप्रमाणेच चार्जरवरही सीमा शुल्क ५ टक्के कपात केली आहे. एखादा चार्जर १ हजार रुपयांचा असेल तर त्यावर २० टक्क्यांनुसार २०० रुपये सीमा शुल्क लागायचा. त्यामुळे चार्जर १२०० रुपयांपर्यंत घ्यावा लागत असे. आता मात्र सीमा शुल्क १५ टक्के झाल्यानं १५० रुपयेच कर लागेल. १ हजार रुपयांचा चार्जर आणि त्यावर १५० रुपये अबकारी कर यासह तुम्हाला 1150 रुपये मोजावे लागतील.
मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता
पीसीबीएवरील करामध्ये सुमारे 10 ते 15 टक्के वाढ करण्यात येईल अशी शक्यता आहे. टेलिकॉम इक्विपमेंट्सच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मोबाइल वापरणाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. हा परिणाम अप्रत्यक्ष असेल आणि त्यात ऑपरेशनल कॉस्ट वाढण्याची शक्यताही आहे. काही काळासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून दरवाढही केली जाऊ शकते. त्यामुळे 5G रोलआउटवरही परिणाम होणं शक्य आहे.